![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: सत्ता जाताच राष्ट्रवादी लागली कामाला; राष्ट्रवादी युवककडून मिशन 'सुपर 100'
Aurangabad News: सत्ता जाताच पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे.
![Aurangabad: सत्ता जाताच राष्ट्रवादी लागली कामाला; राष्ट्रवादी युवककडून मिशन 'सुपर 100' maharashtra News Aurangabad News Mission Super 100 by Nationalist Youth congress Aurangabad: सत्ता जाताच राष्ट्रवादी लागली कामाला; राष्ट्रवादी युवककडून मिशन 'सुपर 100'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/8b63f324002c827435b5f7a38cec330c1657963314_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळले. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता विरोधपक्षाच्या भूमिकेत राहावे लागणार आहे. त्यामुळे सत्ता जाताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघात 'सुपर 100' ही संकल्पना राबवली जाणार आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी माहिती देतांना म्हंटले आहे की, राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघात 'सुपर 100' ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी 'राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा निरीक्षक यादी' जाहीर करण्यात आली आहे. ज्यांची विधानसभा निरीक्षक पदासाठी निवड झाली आहे ते आपापल्या मतदारसंघात पक्षवाढीसाठी काम करतील. सोबतच सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याच काम सुद्धा त्यांच्यामाध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात विरोधीपक्ष म्हणून सक्षमपणे काम करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरु झाली आहे.
महत्वाच्या मतदारसंघातचं निवड...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राबवण्यात येत असलेल्या 'सुपर 100' ही संकल्पनेत फक्त महत्वाच्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी दोन तालुक्यासाठी एकाच व्यक्तीची विधानसभा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, औरंगाबाद मध्य, पैठण, गंगापूर, वैजापूर याच मतदारसंघात विधानसभा निरीक्षकाची निवड करण्यात आली आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे, त्याच मतदारसंघाची 'सुपर 100' ही संकल्पनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस कामाला लागली आहे.
मुख्यमंत्री मेळाव्यात तर अजित पवार बांधावर...
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर समर्थकांकडून त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे विविध मेळाव्यात उपस्थित राहताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते अजित पवार मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतांना फिल्डवर जाऊन काम करणारे अजित पवार विरोधीपक्षात गेल्यानंतर आणखी जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाची बातमी...
कोण सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कामाला लागा; बीएमसी निवडणुकीसाठी शरद पवार यांचे आदेश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)