एक्स्प्लोर

आता जमिनीवर आल्यासारखं वाटतंय : धनंजय मुंडे 

Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज परळीमध्ये सत्काराच्या कार्यक्रम आयोजन केला होता. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपण मंत्री नसल्याचा जास्त आनंद होत असल्याचं मिश्किल भाष्य केलं.

Dhananjay Munde : "मंत्री असल्याने मुंबईत राहावं लागायचं. बैठका घ्याव्या लागायच्या त्यामुळे तुमच्यात राहता येत नव्हतं. आता आपलं सगळ्यांसारखंच आहे. आता जमिनीवर आल्यासारखं वाटतंय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (15 जुलै) बीड जिल्ह्यातील परळीमध्ये त्यांच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपण मंत्री नसल्याचा जास्त आनंद होत असल्याचं मिश्किल भाष्य केलं आहे.

"मंत्री म्हणून जर कोणाला आनंद होत असेल तर धनंजय मुंडे म्हणून मला होत आहे. कारण मंत्री असताना तीन चार दिवस मुंबईत राहावं लागायचं. मीटिंग घ्याव्या लागायच्या. जमिनीवरुन फूटभर वर मंत्री झाल्यावर वाटायचं की मी फूटभर वर आहे. जवळचे लोक पण बोलायचे असे तू मंत्री झालास मग माझं काय? मला आनंद आहे की मीच मंत्री नाही, तुझं जसं आहे तसंच माझं आहे. पण या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे," असं धनंजय मुंडे म्हणाले. 

सत्ता असो नसो विकासाचा निधी कमी पडू देणार नाही : धनंजय मुंडे
"आपण सत्तेत नसताना आपला निधी रोखण्याचं काम काहींनी केलं. इथले लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्तेत होते तरी देखील ते आपला निधी रोखू शकले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होतं, उपमुख्यमंत्री कोण होतं याचं आपल्याशी देणं घेणं नाही. सत्ता असो नसो विकासाचा निधी कमी पडू देणार नाही, असं यानिमित्ताने मी वचन देतो, असं धनजंय मुंडे म्हणाले. "पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात परळी मतदारसंघाचं कर्तृत्व एवढं मोठं असणार आहे की परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय राज्यात कुठलीही मोठी राजकीय घडामोड घडणार नाही," असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

OBC reservation : ओबीसी आरक्षणाचा निर्णय येईल तेव्हा येईल, परळी नगर परिषद निवडणुकीत आम्ही ओबीसींना 27% जागा देणार - धनंजय मुंडे

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget