Aurangabad: जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक घटली; पाणीसाठा 53 टक्क्यांवर
Jayakwadi Update: अवघ्या दोन दिवसात धरणात 16 टक्क्यांनी पाण्याची वाढी झाली आहे.
Aurangabad Rain Update: मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अवघ्या दोन दिवसात धरणात 16 टक्क्यांनी वाढी झाली असून, धरण 52.74 टक्के भरला आहे. नशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. तसेच आगामी काळात असाच पाऊस झाल्यास जायकवाडी धरण यावर्षी सुद्धा शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरणाची आत्ताची परिस्थिती...
सद्या जायकवाडी धरणात 35 हजार 555क्युसेक या वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. तर जायकवाडी धरण 52.74 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील जिवंत पाणीसाठा 1144.904 दलघमी आहे. तर फुटामध्ये पाणीपातळी 1512.09 फुट असून, मीटरमध्ये 460.885 मीटर आहे. धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन दिवसात धरणात 16 टक्क्यांनी वाढी झाली आहे.
Marathwada Rain Update: मराठवाड्यात पाणीच-पाणी; पहा कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती
शेतात पाणीच-पाणी...
सलग तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली आहे. मात्र सलग होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी तुंबले आहे. त्यामुळे कापूस, तूर, मका, सोयाबीन, बाजरी आणि मठ या पिकांना मोठा फटका बसत आहे. पिकं अजून लहान असतांनाच शेतात पाणी तुंबल्याने ते आता पिवळे पडू लागली आहे. त्यामुळे याचा परिणाम वाढीवर आणि उत्पनावर सुद्धा होण्याची शक्यता आहे. पावसाच्या सुरवातीलाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने हे वर्षे कसे जाणार अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या...
बापापुढे पूरही हरला, तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन त्याने काढला मार्ग
Maharashtra Rains : पालघरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत
Maharashtra Mumbai Rains LIVE: मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत, पालघरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट