(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही: नामांतरावरून खैरेंचा शिंदे-फडणीस सरकारला इशारा
Aurangabad News: नामांतराच्या निर्णयाचं श्रेयं घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यांच्या याच निर्णयावर प्रतिक्रिया देतांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रीमंडळात निर्णय झाला असला तरी केंद्राची मंजुरी अजूनही बाकी आहे. त्यामुळे एका महिन्यात या सरकारने केंद्रातून मंजुरी आणावी अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा खैरे यांनी दिला आहे.
काय म्हणाले खैरे...
शिंदे सरकारच्या नामांतराच्या निर्णयावर बोलतांना खैरे म्हणाले की, आम्ही 1988 पासून नामांतरासाठी आंदोलन करत आहोत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतांना औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला. मात्र शिंदे सरकारने या निर्णयाला काल स्थगिती दिली. त्यानंतर आम्ही त्याचा जो निषेध व्यक्त केला, त्यांनतर हे जागे झाले आणि त्यामुळेच आज निर्णय घेण्यात आला असल्याचे खैरे म्हणाले. मात्र इथला निर्णय झाला असून, लवकर यांनी दिल्लीतून नामांतराच्या निर्णयाला मंजुरी मिळवून आणावी अशी मागणी खैरे यांनी केली आहे. तसेच एक महिन्यात हा निर्णय झाला नाही तर यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा खैरे यांनी दिला आहे.
दोन्ही गटातील वातावरण तापले...
एखाद्या निवडणुकीत सुद्धा जेवढ्या राजकीय घडामोडी घडत नसाव्या तेवढ्या घडामोडी सद्या शहरातील शिंदे गट आणि शिवसेनेत घडतांना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप केले जात आहे. आतातर तर आरोप करतांना थेट एकमेकांच्या खाजगी आयुष्याचा उल्लेख केला जात आहे. तर कोण किती निष्ठावंत आहे याचे दाखले दिले जात आहे. अशात भाजप,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे आगामी काळात हे राजकीय युद्ध आणखी किती पेटणार की विझणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: शिंदे-फडणवीस सरकारच्या नामांतराच्या निर्णयावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Aurangabad: शिंदे सरकारने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयानंतर भाजपकडून जल्लोष