Aurangabad: भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला ट्रकची धडक, अपघातात जागीच...
Aurangabad : अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
![Aurangabad: भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला ट्रकची धडक, अपघातात जागीच... maharashtra News Aurangabad News A woman who went out to buy vegetables was hit by a truck Aurangabad: भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला ट्रकची धडक, अपघातात जागीच...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/93a7f035bd5e22249dc02b425efdbda7166279266127489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Accident: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोपेडवरून भाजी खरेदीसाठी सासऱ्यासोबत निघालेल्या एका महिलेचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या वैजापूर शहरातील नवीन भाजीमंडी परिसरात ही घटना घडली आहे. तर अपघाताच होताच ट्रक चालकाने पळ काढला आहे. तर माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रतिभा राजेंद्र चौधरी (वय 40 वर्षे, रा. वैजापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठ वाजता प्रतिभा चौधरी या आपल्या सासऱ्यासोबत वैजापूर-येवला रोडववरील नवीन भाजी मंडीत खरेदीसाठी निघाल्या होत्या. दरम्यान याचवेळी येणाऱ्या ट्रक क्रमांक MP 20 HB 8312 ने दिलेल्या जोरदार धडकमुळे प्रतिभा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचे सासरे जखमी झाले आहेत. घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
महिलेचा जागीच मृत्यू...
प्रतिभा चौधरी स्वतः गाडी चालवत होत्या. ट्रकचा धक्का लागून त्या कोसळल्या आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघातात एवढा भयंकर होता की, प्रतिभा यांच्या डोक्याचा जागीच चेंदामेंदा झाला होता.
ट्रक चालक फरार...
वैजापूर येथील येवला रोडवरील भाजीमंडी परिसरात झालेल्या अपघातानंतर, ट्रक चालक तेथून आपल्या ट्रकसह फरार झाला आहे. त्यामुळे काही लोकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळाला नाही. त्यामुळे तो ज्या दिशेन गेला तेथील नागरिकांना फोनवरून सदर घटनेची माहिती देण्यात आली. त्यामुळे येवला येथील दौडगाव येथील नागरिकांनी ट्रक अडवत पकडला आहे. त्यामुळे वैजापूर पोलीस ट्रक ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
महत्वाची बातम्या...
मोठी बातमी! प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर गायब, औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल
Prashant Bamb Vs Teachers: आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षकांवर एवढा राग का आहे?; वाचा सविस्तर...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)