(Source: ECI/ABP News/ABP Majha)
YouTuber Bindass Kavya: प्रसिद्ध यूट्युबर बिनधास्त काव्या कालपासून बेपत्ता; पोलिसात गुन्हा दाखल
Aurangabad : मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
YouTuber Missing: औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर काल दुपारपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला आहे. विशेष म्हणजे ही अल्पवयीन मुलगी यूट्युबर प्रसिद्ध असून, तिचे यूट्युबवर 4.32 मिलियन सबक्राबर आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर कालपासून गायब आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे अखेर छावणी पोलिसात याप्रकरणी मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आता मुलीचा शोध सुरु आहे.
आईची प्रतिक्रिया....
याबाबत या मुलीच्या आईने एक 19 मिनटाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, ज्यात आमची मुलगी कधीही एकटी राहत नाही. एवढ्या वेळ ती एकटी राहू शकत नाही. त्यामुळे तिला कुठेही पाहिले तर आम्हाला माहिती कळवा असे आवाहन केले आहे. सोबतचा आम्हाला कुणीही मदत करत नसल्याचा आरोपही मुलीच्या आईने केला आहे.
काव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा...
बिनधास्त काव्याचे सोशल मीडियावर मोठे फॉलोवर्स आहे. यु ट्यूबवर तिचे 42 लाख फॉलोवर्स आहे. तर फेसबुकवर सुद्धा तिची चलती आहे. त्यामुळे काव्या बेपत्ता असल्याची बातमी येताच तिच्या फॉलोवर्स ती पुन्हा सापडावी म्हणून पोस्ट टाकल्या जात आहे.