एक्स्प्लोर

संतापजनक! स्कूलबसमध्ये घुसून रिक्षाचालक करायचा शाळकरी मुलींशी अश्लील चाळे, पालकांनी सापळा लावून दिला चोप

Aurangabad : मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला असता आरोपींना सापळा लावून रंगेहात पकडण्यात आले.

Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला असून, स्कूलबस शाळेच्या मागे उभी करून चालक चहा पिण्याच्या बहाण्याने बस सोडून जायचा आणि त्याचवेळी एक रिक्षाचालक (Rickshaw Driver) स्कूलबसमध्ये (School Bus) घुसायचा घुसून आठ व नऊ वर्षीय तीन शाळकरी मुलींशी अश्लील चाळे करायचा. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पालकांना सांगायचं नाही म्हणून धमक्या द्यायचा. मात्र घाबरलेल्या मुलींनी पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी शाळेत सापळा रचून अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला रंगेहात पकडून चोप देत सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. विकास विठ्ठलराव बनकर (वय 38 वर्षे, रा. गल्ली क्र. 10, आंबेडकरनगर) आणि राजू मोहन रुपेकर (रा. पिसादेवी) आरपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया (वय 9 वर्षे), अतिथी (वय 8 वर्षे) आणि आरती (वय 8 वर्षे) तिन्ही नावे काल्पनिक आहेत) या तिन्ही मुली शहरातील एन-9 हडकोतील एका शाळेत शिकतात. तर तिन्ही मुली आरोपी राजू रुपेकर याच्या स्कूलबसमधून नियमित शाळेत जातात. दरम्यान 7 डिसेंबरला रुपेकरने शाळेच्या मागे नाल्याजवळ स्कूलबस उभी केली आणि तो निघून गेला. पण काही कामानिमित्त गेला असावा असा मुलींचा समज झाला. मात्र रुपेकर जाताच आधीपासून तेथेच असलेला रिक्षाचालक विकास बनकर स्कूलबसमध्ये घुसला आणि त्याने तिन्ही अल्पवयीन मुलींशी अश्लील बोलणे, गालांवरून ओठांवरून हात फिरविणे, असे घाणेरडे प्रकार सुरु केले. त्यामुळे तिघी प्रचंड घाबरल्या. 

मुलींना दिली धमकी... 

विकास बनकरने स्कूलबसमध्ये घुसून मुलींसोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर हा प्रकार घरच्यांना सांगू नये म्हणून धमकी दिली. तुम्ही जर घडलेला प्रकार घरी सांगितला तर, शाळे जवळच्या नाल्यात हातपाय धुता आणि बैलाच्या मटनाची बिर्याणी खाता, असे खोटे तुमच्या आई- वडिलांना सांगेल, अशी धमकी बनकरने मुलींना दिली.

आणि पालकांना धक्काच बसला...

घाबरलेल्या मुली पहिल्या दिवशी घरी फारसे काही बोलल्या नाहीत. मात्र, त्या खूप घाबरलेल्या दिसल्या. त्यात प्रियाच्या आईने तिला याबाबत विचारले, परंतु व्हॅनमध्ये एक घाणेरडा माणून येऊन बसतो, एवढेच तिने सांगितले आणि प्रियाच्या आईने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र याचवेळी बनकरने हा अश्लील प्रकार सुरुच ठेवला. त्यामुळे 10 डिसेंबरला तिन्ही मुलींनी शाळेत जायला स्पष्ट नकार दिला. मुली शाळेत जायला का नकार देतात, असा प्रश्न पालकांना पडला. त्यामुळे पालकांनी मुलींशी आपुलकीने बोलून त्यांना बोलते केले. तेव्हा तिघींनीही आपल्या पालकांना व्हॅनमध्ये घडत असलेल्या गैरप्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर पालकांना धक्काच बसला.

पालकांनीच लावला सापळा

तिन्ही मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यामुळे पालकांनी 12 डिसेंबरला सापळा रचला. मुलींचे पालक शाळा परिसरात व्हॅन ज्या भागात उभी राहते त्या परिसरात लपून बसले. व्हॅन उभी राहिल्यानंतर रुपेकर निघून गेला. त्याने जाताना बनकरला इशारादेखील केला. त्यानंतर काही क्षणातच बनकर स्कूलबसमध्ये घुसला. तो मुलींशी अश्लील प्रकार करायला लागला. तेवढ्यातच पालकांनी त्याला रंगेहात पकडले. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडून चोप दिला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलींचा सुरक्षेचा प्रश्न कायम...

औरंगाबाद शहरात घडलेल्या या घटनेनंतर पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर मुलींचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमरे देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावरून शाळेचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप होत आहे. तर या सर्व घटनेत शाळेचा हलगर्जीपणा समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी यांनी दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget