Crime: आरोपी शोधण्यासाठी ठेवला खिचडी वाटपाचा कार्यक्रम, पण प्लॅन फसला; त्यानंतर पोलिसांनी चक्क...
Aurangabad: औरंगाबाद येथील गाड्यांच्या पगारिया शोरूममध्ये झालेल्या धाडसी चोरीनंतर शहरात खळबळ उडाली होती.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील आदालत रोडवरील पगारिया शोरूम फोडणाऱ्या गुन्हेगारांचा पोलिसांनी शोध लावून बेड्या ठोकले आहे. या गुन्ह्यातील आठ जणांच्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर 27 गुन्हे दाखल असून यातील 14 गुन्हे शोरूम फोडीचे आहे. औरंगाबादच्या गुन्हे शाखेने जळगाव येथून या आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे आरोपी राहत होते त्या ठिकाणी 200 पाल होते. या 200 पालमधून तिघांचे शोध घेणे अवघड होते. मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या शक्कल लढवत अखेर तिघांना बेड्या ठोकल्या. शिवा नागूलाल मोहिते (वय 32 ), सोनू नागूलाल मोहिते (वय 25, दोघे रा. विचवा, पो. सुरवाडा, ता. बोधवड, जि. जळगाव), अजय सीताराम चव्हाण (वय 32, रा. धानोरी, पो. सुरवाडा, ता. बोधवड, जि. जळगाव), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
औरंगाबाद येथील गाड्यांच्या पगारिया शोरूममध्ये झालेल्या धाडसी चोरीनंतर शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या टोळीचा मोरक्या सोनू मोहिते असून, त्यासोबत आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी पाच जण फरार असून, त्यांचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींवर एकूण 27 गुन्हे दाखल असून, महाराष्ट्रसह गुजरातमध्ये सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल. विशेष म्हणजे ही टोळी शोरूम फोडण्यात माहीर असल्याच समोर आलं आहे. त्यांच्यावर आतापर्यंत 14 शोरूम फोडण्याचे गुन्हे दाखल आहे.
200 पालमध्ये खिचडी वाटली...
गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाल्यावर पोलिस त्यांच्या जळगाव येथील राहत्या ठिकाणापर्यंत पोहचले. पण आरोपी राहत असलेल्या ठिकाणी जवळपास दोनशे आणखी कुटुंब पाल टाकून राहत होते. त्यांच्यात घुसून आरोपींना शोधणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी शक्कल लढवली. सुरवातीला पोलिसांनी आरोग्य कर्मचारी म्हणून जाऊन एक एक जण तपासावा, असा प्लॅन बनवला. पण सायंकाळच्या वेळी आरोग्य कर्मचारी आले कसे? अशी शंका घेऊन विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी हा प्लॅन रद्द केला.
पुढे खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठरला. त्यानुसार पोलिसांनी अंदाजे दहा किलो तांडळाची खिचडी आणून वाटप सुरू केले, परंतु तेथे केवळ महिला व लहान मुले आली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलिस पथक मॉर्निंग वॉक करीत पालांच्या परिसरात गेले. तेथेच थांबून जे लोक दुचाकीवरून बांगड्या विक्रीसाठी बाहेर पडत आहेत, त्यांच्यावर नजर ठेवली. यावेळी पोलिसांकडे असलेल्या फोटोतील संशयितांचा पाठलाग करत पोलिसांनी अखेर तिघांना बेड्या ठोकल्या.
पाच आरोपी फरार....
आठ पैकी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर पाच आरोपी अजूनही फरार आहे. ज्यात अभिषेक देवराम मोहिते (वय 19), जितू मंगलसिंग बेलदार (वय 24, दोघे रा. धानोरी, ता. बोदवड, जि. जळगाव), विशाल भाऊलल जाधव (वय 22), बादल हिरालाल जाधव ( वय 19, दोघे रा. बाजारपट्टीजवळ, नागाव, मुक्ताईनगर, जि. जळगाव), करण गजेंदर बेलदार (चव्हाण) (वय 25, रा. दाभे पिंपरी, बुऱ्हाणपूर रोड, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी फरार असलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या...
हवेत उडायचं होते म्हणून पठ्ठ्याने यु ट्युबवर व्हिडिओ पाहून चक्क हेलिकॉप्टरच बनवला