हवेत उडायचं होते म्हणून पठ्ठ्याने यु ट्युबवर व्हिडिओ पाहून चक्क हेलिकॉप्टरच बनवला
Aurangabad News: सतीशला लहानपणापासूनच हवेत उडणाऱ्या गोष्टींबद्दल कुतुहूल वाटायचे.
Aurangabad News: औरंगाबादमध्ये एका 22 वर्षीय तरुणाने युट्युब वर व्हिडिओ पाहून चक्क हेलिकॉप्टर बनवला आहे. हवेत उडणाऱ्या गोष्टी त्याला आवडायच्या म्हणून त्याने स्क्रॅपमधील वस्तूंपासून हेलिकॉप्टर तयार केले आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने तीन वर्षे नोकरी करून जमा केलेला पूर्ण पगार पणाला लावला आहे. मूळचा परळीचा असणारा आणि सद्या औरंगाबादच्या वाळूज भागात राहणारा सतीश भास्कर मुंडे (वय 22 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे.
सतीशला लहानपणापासूनच हवेत उडणाऱ्या गोष्टींबद्दल कुतुहूल वाटायचे. त्यामुळे आपणही हवेत उडावे, विमानात, हेलिकॉप्टरमध्ये बसावे असे त्याला सतत वाटायचे. मात्र सतीश याच्या घरीची परिस्थिती जेमतेम असल्याने त्याच्यासाठी हे शक्य नव्हते. पण एक दिवस सहज त्याने विचार केला की, आपण स्वतःचा हेलिकॉप्टर तयार केला तर?, आणि सतीश कामाला लागला.
यु ट्युबवरील व्हिडीओची घेतली मदत...
हेलिकॉप्टर तयार करायचा म्हणजे त्यासाठी महागडे इंजिन, वस्तू लागणार होत्या. त्यात तांत्रिक पद्धतीचे ज्ञान सुद्धा असायला पाहिजे होते. त्यामुळे सतीशने यु ट्युब आणि इंटरनेटची मदत घेतली. विशेष म्हणजे यु ट्युबवरील व्हिडीओद्वारे सतीशने हेलिकॉप्टरचे 70 टक्के काम पूर्ण केले आहे. आतापर्यंतच्या कामासाठी त्याला दोन ते अडीच लाख खर्च आला आहे. तर अजून हेलिकॉप्टरच्या बाह्यावरणाचे व सेफ्टीचे काम बाकी आहे. त्यासाठी आणखी एक ते दीड लाख रुपये लागणार आहे. मात्र आर्थिक अडचण असल्याने सद्या त्याने आपले काम थांबवले असून, आणखी पैसे जमा करून वर्षभरात काम पूर्ण होईल, असे सतीश म्हणाला आहे.
असा बनला हेलिकॉप्टर...
घरची परिस्थिती चांगली नसल्याने हेलिकॉप्टर बनवणे सतीशसाठी अवघड होते. पण त्याने तीन वर्षे एका खाजगी कंपनीत काम करून, पैसे जमा केले. त्यातून जुन्या मारुती कारचे इंजिन विकत घेतले. तर इतर साहित्य भंगारातून खरेदी केले. यु ट्युबवरील व्हिडीओद्वारे स्वप्नातील हेलिकॉप्टर उभा केला. मात्र आता आर्थिक अडचणींमुळे हेलिकॉप्टरच्या कव्हरिंगचे काम अर्धवट राहिले असून, त्यासाठी सतीश पैश्यांची जमवाजमव करत आहे.
महत्वाच्या बातम्या...
अन् भर मुलाखतीत खैरेंनी पायातील बूट हातात घेतला, नेमकं काय घडलं पहा...