LGBTQ : समलिंगी मैत्रिणींमधील लग्नाचा वाद पोलीस ठाण्यात! औरंगाबाद पोलिसांसमोर पहिल्यांदाच 'असा' प्रकार
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री अधिक दृढ झाली. कॉलेज, अभ्यासाच्या निमित्तानं दोघींच्या भेटी वाढल्या. पुढे...
LGBT Community : मुलाने लग्नाचं वाचन दिलं आणि फसवलं. मुलींने लग्नाचं आणाभाका खाल्ल्या आणि फसवलं. अशा अनेक तक्रारी आपण पाहिल्या तसेच ऐकल्या असतील. औरंगाबाद मध्येही दोन समलिंगी मैत्रिणीमधील लग्नाचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. नेमका प्रकार काय?
....अन् तणावग्रस्त झालेल्या एका मैत्रिणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं.
औरंगाबादमध्ये या दोन मैत्रिणी एकाच वसाहतीत राहतात. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री अधिक दृढ झाली. कॉलेज ,अभ्यासाच्या निमित्तानं दोघींच्या भेटी वाढल्या. एकमेकांच्या घरी जाणं येणं सुरु झालं. पुढे मैत्रीचं रूपांतरण प्रेमात झालं. या दोघींच्या प्रेमाचं नातं वर्षभर व्यवस्थित होतं. पण आपल्या मैत्रिणीचं वागणं आता बदललं आहे ती आपल्यावर अधिकार दाखवत आहे अशी भावना दुसऱ्या मैत्रिणीच्या मनात आली. त्यामुळे तिनं या नात्यातून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. माहितीनुसार एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रीणीला वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावत होती .मात्र दुसऱ्या मैत्रिणीला हे मान्य नव्हतं. त्यावर एकीने दुसरीला धमक्या द्यायला सुरुवात केली. लग्न केले नाही, तर आपल्या दोघींचे काही फोटो समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तणावग्रस्त झालेल्या एका मैत्रिणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं.
पोलीस निरीक्षक म्हणतात..
या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.जी. एस. दराडे यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, सुरूवातीला हा सर्व प्रकार पाहून पोलिस चक्रावले. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोघींचीही समजूत घातली. पोलीसांनी दोघींच्या आई-वडिलांना बोलवलं, आणि सर्वांचं समुपदेशन केलं आणि सामोपचाराने हे प्रकरण मिटवलं.
औरंगाबाद पोलिसांसमोर पहिल्यांदाच असा प्रकार
औरंगाबाद पोलिसांनी समोर ही पहिली जरी केस असली तरी यापुढे अशा तक्रारींना सामोरं जाण्याची पोलिसांनी तयारी ठेवायला हवी. महिलांच्या तक्रारी वाढल्या, आणि स्वतंत्र महिला पोलिस ठाणे निर्माण झाले. भविष्यात अशा तक्रारींवाढत गेल्या तर पोलीस ठाण्यात एखादा वेगळा सेल करायला लावला तर आश्चर्य वाटायला नको.
संबंधित बातम्या