एक्स्प्लोर

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत पहिली गे मॅरेज पार्टी

रेनबो व्हॉईस मुंबईचे संस्थापक असलेले 43 वर्षीय विनोद फिलीप आणि फ्रान्सचे रहिवासी असलेले त्यांचे 47 वर्षीय मित्र विन्सेंट यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रान्समध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर मुंबईतील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुंबई : दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध कलम 377 अंतर्गत गुन्हा नसल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने पाच महिन्यांपूर्वी दिला होता. त्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच उघडपणे समलैंगिक लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. मुंबईतील विनोद आणि फ्रान्सचे विन्सेंट यांनी साताजन्माची गाठ बांधली. भारतात अद्याप समलैंगिक विवाहाला मान्यता नसली, तरी समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर आणणं हे 'गे मॅरेज'च्या दिशेने पाऊल असल्याचं एलबीजीटी समुदाय मानतं. रेनबो व्हॉईस मुंबईचे संस्थापक असलेले 43 वर्षीय विनोद फिलीप आणि फ्रान्सचे रहिवासी असलेले त्यांचे 47 वर्षीय मित्र विन्सेंट यांचा विवाह झाला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रान्समध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर मुंबईतील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. विनोद 2014 साली चेन्नईहून मुंबईत आले. तेव्हापासून त्यांनी एलजीबीटी समुदायासाठी काम करण्यास सुरुवात केली. या शहराने ओळख दिल्यामुळे विनोद यांना मुंबईविषयी विशेष प्रेम होतं. त्यामुळे मुंबईत विवाहसोहळा आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 2016 मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून पॅरिसमध्ये दोघांची ओळख झाली होती. चॅटिंग करता-करता दोघांनी डेटिंग सुरु केलं. सहा महिन्यांनंतर ते दोघं एकत्र राहायला लागले. त्यानंतर दोघांना प्रेमाची जाणीव झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हा समलैंगिक विवाह असल्याची माहिती अखेरच्या क्षणापर्यंत हॉटेल व्यवस्थापनापासून लपवण्यात आली होती. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबत माहिती मिळताच व्यवस्थापनाने पूर्ण सहकार्य केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget