(Source: Poll of Polls)
Aurangabad: मोबाईल लोन फसवणूक प्रकरणी उत्तराखंड पोलिसांची औरंगाबादमध्ये छापेमारी, कारवाईत कॉल सेंटर उद्ध्वस्त
Instant Loan Application: फोटो माफींग करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी औरंगाबादमध्ये ही कारवाई केली आहे.
औरंगाबाद: मोबाईल लोन फसवणूक प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी औरंगाबादमध्ये छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. फोटो मॉर्फिंग करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतंय. मोबाईल लोन फसवणूक प्रकरणी सुरू असलेलं कॉल सेंटरही या कारवाईच्या दरम्यान उद्ध्वस्त करण्यात आलं आहे.
फोटो माफींग करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करत आरोपींचा शोध घेण्यासाठी उत्तराखंड पोलीस औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. औरंगाबाद पोलिसांच्या मदतीने शहरातील पैठण गेट परिसर येथील यश इंटरप्रायजेसवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या गुन्ह्यातील वापरण्यात आलेल्या 32 सिमकार्ड पैकी 23 सिमकार्ड आणि 5 मोबाईल हॅण्डसेट केले जप्त करण्यात आले आहेत.
रुपी अॅपवर कर्ज घेतले लोकांकडून वसुली करण्याचा ठेका यश एंटरप्राइजकडे होता. औरंगाबादमध्ये सील्लेखान चौकात त्यांचे कार्यालय असून, तिथे तीन शिफ्ट मध्ये 200 ते 300 मुलं काम करतात. रुपी बँकेने कर्ज दिलेल्या लोकांना फोन करून वसुली करण्याचा ठेका या कंपनीला दिलेला होता. उत्तराखंड पोलिस पथक कारवाईसाठी आले होते. त्यांचं म्हणणं आहे की या औरंगाबादच्या कॉल सेंटरमधून त्यांच्याकडे तक्रार केलेल्या लोकांना फोन जातात, आणि वसुलीसाठी त्यांना धमक्या दिल्या जातात. याप्रकरणी उतरखंडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी औरंगाबाद शहर पोलिसांची मदत घेतली. त्यासाठी औरंगाबाद सायबर आणि गुन्हे शाखेच्या मदतीने कारवाई करण्यात आली. उतरखंड पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले सिमकार्ड आणि मोबाईल जप्त केले. सोबतच हा कॉल सेंटर चालवणाऱ्या मालकाच्या केबिनमध्ये दोन तीन तलवारी आणि एक एअर गन सापडली आहे. त्यामुळे फक्त उतरखंडच नव्हे तर इतर जिल्ह्यातील देखील लोकांना अशाप्रकारे फोन करून धमक्या देण्याचा प्रकार या ठिकाणाहून सुरू असल्याचा पोलिसांना संशय आहे.
औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलंय की, 18 जानेवारी रोजी त्तराखंड राज्यातील देहराडून सायबर विभागाचे पोलिस पथक तपासासाठी औरंगाबादमध्ये आले होते. त्यांचेकडे Instant Loan Application च्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची नावं आहेत. Instant Loan Application द्वारे फिर्यादीचे फोटो मॉर्फिंग करुन त्याची आर्थिक फसवणूक केली गेली आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. यामध्ये देहराडून पोलीसांनी तपासात सहकार्य करणे बाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांचेकडे विनंती केली होती. सायबर पोस्टचे अधिकारी आणि स्टाफसह आरोपीचा शोध घेण्यासाठी गेले असता, पैठण गेट परिसर येथील यश इंटरप्रायजेस, या ठिकाणी गुन्ह्यातील आरोपीचे मोबाईल लोकेशन मिळाले. त्याच्या मदतीने नमूद ठिकाणी सदर गुन्ह्यातील वापरण्यात आलेल्या 32 सिमकार्ड पैकी 23 सिमकार्ड आणि 5 मोबाईल हॅण्डसेट आढळून आले. ते देहराडून, उत्तराखंड पोलिसांनी जप्त केले आहेत. देहराडून पोलिसांनी तेथील 10 टेलीकॉलर, टीमलिडर यांना सीआरपीसी कलम 41 प्रमाणे नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक विकास भारद्वाज, सायबर पोलीस स्टेशन, देहराडून, उत्तराखंड आणि त्यांच्या टीमने सायबर पोलीस स्टेशन तसेच क्रांतीचौक पोलीसांच्या मदतीने करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा :