एक्स्प्लोर

Nanded News: अनोळख्या लिंकवर क्लिक करताच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या खात्यातून साडेपाच लाख गायब, नांदेडमधील घटना

Nanded Crime News: या प्रकरणी नांदेड शहर पोलिसांच्या भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded Crime News: गेल्या काही दिवसांत सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याचे समोर आले आहे. अशात अनोळखी लिंक पाठवून त्यावर क्लिक करताच तुमच्या खात्यातील पैसे गायब करण्याच्या घटना देखील समोर येतायत. आता अशीच काही घटना नांदेड शहरातील (Nanded City) गोपाळकृष्णनगर परिसरात समोर आली आहे. अनोळखी ॲपची लिंक पाठवून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला बँक खाते व इतर माहिती भरण्यास सांगण्यात आले होते. सेवानिवृत्ताने माहिती भरताच पाच वेळेस त्यांच्या खात्यातून तब्बल 5 लाख 89 हजार रुपये लंपास करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर या प्रकरणी नांदेड शहर पोलिसांच्या भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक गोपाळराव फुटाणे असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळराव फुटाणे यांच्या मोबाइलवर 9 जानेवारी रोजी युनो ॲप बँकेची लिंक आली. फुटाणे यांनी लिंक ओपन करताच त्यांना अर्ज भरण्यासाठी एका फॉर्म समोर आला. त्यात त्यांनी अर्ज भरल्याप्रमाणे युजर आयडी, पासवर्ड, मोबाइल क्रमांक, एटीएम क्रमांक, सीव्हीसी ही माहिती भरून पाठवली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत फुटाणे यांच्या खात्यातून पाच वेळेस 5 लाख 89 हजार रुपये काढून घेण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचं फुटाणे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी भाग्यनगर पोलिसात धाव घेऊन गुन्हा नोंद केला आहे. 

खात्यात होते सेवानिवृत्तीचे 14 लाख...

विनायक फुटाणे हे काही दिवसांपूर्वी लघुलेखक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे  सेवानिवृत्तीचे 14 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले होते. आयुष्यभराची कष्टाची कमाई असल्याने त्यांच्यासाठी ही रक्कम खूप महत्वाची होती. मात्र एका अनोळखी ॲपची लिंक उघडणे त्यांना महागात पडली आणि खात्यावरील तब्बल 5 लाख 89 हजार रुपये लंपास झाले. खात्यावरील पैसे लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. 

सुशिक्षित लोकं देखील भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहे...

मागील काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळी आमिषे दाखवून अन् अनोळखी ॲपची लिंक पाठवून खात्यातून रक्कम लंपास करण्यात येत आहे. लोकांची फसवणूक होऊ नयेत म्हणून, सायबर सेलकडून जनजागृती करण्यात येत आहे. परंतु त्यानंतरही फसवणुकीच्या घटनांना आळा बसतांना दिसत नाही. विशेष म्हणजे अनेकदा सुशिक्षित लोकं देखील सायबर भामट्यांच्या जाळ्यात सहज अडकत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded News: 'देव तारी त्याला कोण मारी'! टिप्परखाली अडकला अन् जॅक लावून जीव वाचवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget