एक्स्प्लोर

केंद्र सरकारचं नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबतचं शपथपत्र असंवेदनशीलता दर्शवणारं : औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला पीएम केअर फंडमधून मिळालेले व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचं समोर आलं. त्यावर केंद्र सरकारने सादर केलेल्या शपथपत्रावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले. केंद्र सरकारचं शपथपत्र हे त्यांची या मुद्द्यावर असंवेदनशीतला दर्शवणारं आहे, अशा शब्दात औरंगाबाद खंडपीठाने फटकारलं

औरंगाबाद : नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सादर केलेलं शपथपत्र हे या मुद्द्यावर त्यांची असंवेदनशीलता दर्शवणारं आहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फटकारलं. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी यू देबडवार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी (28 मे) सुनावणी झाली. नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबत पुन्हा सविस्तर माहिती घेऊन त्यांची दुरुस्ती किंवा ते बदलून देण्याबाबत केंद्र सरकारचं धोरण काय आहे, याची माहिती 2 जूनला सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे.

घाटीला पीएम केअर फंडमधून मिळालेल्या व्हेंटिलेटरबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अप्पर सचिव जी के पिल्लई यांनी औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र सादर केलं. त्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला (घाटी) पीएम केअर फंडातून 150 व्हेंटिलेटर पुरवलेच नसल्याचं म्हटलं आहे. घाटीला पुरवलेले व्हेंटिलेटर ज्योती सीएनसी या राजकोट इथल्या कंपनीचे आहेत. त्यांची जागतिक स्तरावरील निकषानुसार तपासणी केली आहे. केंद्र शासनाने डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, तंत्रज्ञ आणि बायो मेडिकल इंजिनिअर्स यांना डिजिटल ट्रेनिंग दिलं आहे. औरंगाबादेतील व्हेंटिलेटर हाताळणारे डॉक्टर आणि पॅरामेडिकलचे कर्मचारी योग्य प्रशिक्षित नाहीत आणि व्हेंटिलेटर लावण्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत, असा दावा जी के पिल्लई यांनी शपथपत्रातून केला. 

त्यावर नाराजी व्यक्त करताना खंडपीठाने म्हटलं की, "शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सादर केलेला अहवाल, व्हेंटिलेटर्स वापरणाऱ्या आठ तज्ज्ञ डॉक्टरांचा व्हेंटिलेटर्स नादुरुस्तीबाबतचा अहवाल तसंच व्हेंटिलेटरच्या दुरुस्ती किंवा वापरण्यायोग्य करण्याबाबत कोणतंही भाष्य न करता, थेट व्हेंटिलेटर्स उत्पादकांच्या वतीने बाजू मांडण्याच्या अविर्भावात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सादर केलेलं शपथपत्र हे त्यांची या विषयाबाबतची असंवेदनशीलता दर्शवतं."

रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी उपलब्ध केलेले हे व्हेंटिलेटर रुग्णांसाठी पूर्ण क्षमतेने वापरता यावेत, ही सरकारची प्राथमिकता हवी. नादुरुस्त व्हेंटिलेटर्स दुरुस्तीसंदर्भात किंवा इतर पर्यायांबाबत केंद्र सरकारच्या वकिलांनी पुढील सुनावणीत आपलं म्हणणं मांडावं, असे निर्देश खंडपीठाने दिले आहे.

तज्ज्ञ समितीचा अहवालात अडचणी आणि संभाव्य धोक्याची माहिती
मुख्य सरकारी वकील अॅड. काळे यांनी हे व्हेंटिलेटर वापरणाऱ्या आठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीचा अहवाल सादर केला. या अहवालात व्हेंटिलेटर वापरताना आलेल्या अडचणी आणि त्यांचा वापर केल्याने रुग्णांना होणारा संभाव्य धोका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

व्हेंटिलेटर उत्पादित करणाऱ्या कंपनीने शपथपत्रात काय म्हटलं?
हे व्हेंटिलेटर उत्पादित करणाऱ्या राजकोटमधील ज्योती सीएनसी कंपनीने खंडपीठात शपथपत्र सादर केलं. "सर्व व्हेंटिलेटर्स चांगल्या परिस्थितीत आहेत. औरंगाबाद वगळता देशभरात वितरित केलेले 300 व्हेंटिलेटर्स व्यवस्थित कार्यरत आहेत. घाटीमध्ये या व्हेंटिलेटरसाठी योग्य सुविधा नाहीत. हे व्हेंटिलेटर वापरणारे, हाताळणारे प्रशिक्षित नाहीत, असा दावा या शपथपत्रात केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईनMakrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 27 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Embed widget