एक्स्प्लोर

बोगस बियाणे प्रकरण, कृषी सहसंचालक 13 तारखेला सुनावणीला हजर न झाल्यास अटक करून हजर करा : औरंगाबाद खंडपीठ

सोयाबीनचे बियाणे वितरणात महाबीजची मोठी भूमिका असल्याचे अॅड. पी. पी. मोरे यांनी निदर्शनास आणून देत महाबीजचे चेअरमन आणि संचालक यांना प्रतिवादी करण्याची विनंती केली.

औरंगाबाद : औरंगाबाद विभागात बोगस बियाणे विक्रीमुळे सोयाबीन पिकाची उगवण न झाल्याप्रकरणात औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांना 13 जुलै सकाळी साडेदहा वाजता उच्च न्यायालय खंडपीठात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आणि ते हजर न झाल्यास त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी आज हे निर्देश दिले. डॉ. जाधव यांनी दाखल केलेल्या माहितीतून दोषी कंपन्या आणि विक्रेत्यांना वाचवून सर्व दोष शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे दिसत असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले.

औरंगाबाद विभागात मोठ्या प्रमाणावर बनावट सोयाबीन बियाणे विक्री झाली असून, त्यांची उगवणच झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत खंडपीठाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे. याचिका दाखल करून घेताना खंडपीठाने, पीडित शेतकऱ्यांनी बियाणे निरीक्षकांकडे तक्रार करण्याचे आणि त्यांनी त्याची दखल न घेतल्यास पोलिसांकडे बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेते यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

आजच्या सुनावणीत शासनातर्फे अशा प्रकारच्या 23 तक्रारी दाखल झाल्याचे तसेच तक्रारी प्राप्त झालेल्या कंपन्यांना कारणेदर्शक नोटीस बजावण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मागील आदेशात अशा कंपन्यांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र 22 हजार 831 तक्रारी प्राप्त होऊनही बियाणे निरीक्षकांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या नाहीत. दाखल तक्रारींमध्ये औरंगाबादची ग्रीन गोल्ड आणि इंदूरचे ईगल सीड या कंपन्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या विशिष्ट बॅचमधील बियाणे सदोष आढळल्याचे दिसून येत असल्याने या बॅचमधील बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी थेट दाखल घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

सोयाबीनचे बियाणे वितरणात महाबीजची मोठी भूमिका असल्याचे अॅड. पी. पी. मोरे यांनी निदर्शनास आणून देत महाबीजचे चेअरमन आणि संचालक यांना प्रतिवादी करण्याची विनंती केली. यावर, त्यांची दोषी कंपन्यांशी हातमिळवणी असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. असे बियाणे उत्पादित करण्यासंदर्भातील सर्व रेकॉर्ड जतन करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. तसेच हे बियाणे प्रमाणित करण्यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्याचेही निर्देश देण्यात आले. दुबार पेरणी करूनही उगवण न झाल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याची नोंद खंडपीठाने घेतली आणि संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले. विभागातील सर्व पोलीस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्तांना अशा तक्रारी दाखल करून घेण्यासंदर्भात योग्य ती पाऊले उचलण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.

कृषी सहसंचालक, औरंगाबाद यांच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या माहितीवर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. यात बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेते यांना वाचवून शेतकऱ्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करत खंडपीठाने विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद विभाग डॉ. डी. एल. जाधव यांना प्रत्यक्ष उपस्थितीचे आदेश दिले. आदेशाचे पालन न झाल्यास त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचेही निर्देशित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विरोधात वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणात अमायकस क्युरी म्हणून अॅड. पी. पी. मोरे, राज्य शासनातर्फे अॅड. डी. आर. काळे तर केंद्र शासनातर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे काम पाहत आहेत. पुढील सुनावणी 13 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

Dada Bhuse | बोगस बियाणे प्रकरणात दोषी असल्यास महाबीजवरही कारवाई : कृषीमंत्री दादा भुसे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Embed widget