एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजपची खेळी; शिवसेना अडचणीत?
औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजपने नवी खेळी खेळल्याने सत्तेत असलेली शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपनं यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेत सादर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्वप्न पुर्ण करावं असं आवाहन शिवसेनेला केलं आहे. मात्र, या प्रस्तावामुळं आता शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हा वाद गेल्या 28 वर्षांपासून सुरु आहे. 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा नारा दिला होता, तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेना संभाजीनगर की औरंगाबाद या मुद्द्यावरुनच निवडणुका लढतेय. त्यात आता सत्तांतर झालं, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं शिवेसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत, आणि यातच शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपनं नवी खेळी केली आहे. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी नव्यानं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं असा प्रस्ताव मांडला आहे. महापालिकेनं तो सर्वसाधारण सभेत मंजूर करुन मुख्यमंत्र्यांना पाठवावा आणि त्याचं स्वप्न पुर्ण करावं असा चिमटा भाजपनं काढला आहे.
शिवसेनेला या शहराचं नाव बदलायचं आहे. मात्र, सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्तेत असल्यानं सध्या हा मुद्दा त्यांना अडचणीचा आहे. मात्र, तरीसुद्धा सारवा सारव करणं शिवसेनेकडून सुरू आहे. या आधी 2013 ला आणि त्यानंतर 2016 ला अशा आशयाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. त्यामुळे नव्यानं प्रस्ताव पाठवण्याची गरज नसल्याचं महापौरांच म्हणणं आहे. ही सगळी स्टंटबाजी असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.
सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं?
सर्वसामान्य नागरिकांची याबाबत वेगळी मतं आहे. कुणी विरोध करतंय, तर कोणी प्रथम पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या अशी मागणी करतंय. औरंगाबाद की संभाजीनगर या वादावरुन महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांनी 27 वर्षे राज्य केले. या शहराचं मलिक अबंर यानं ठेवलेलं जुनं नाव म्हणजे खडकी, त्यानंतर औरंगजेब या भागाचा सुभेदार झाला आणि त्यानं या शहराच नाव औरंगाबाद केलं, त्यात 1988 मध्ये बाळासाहेबांनी नारा दिल्यावर शिवसेना, भाजप या शहराला संभाजीनगर म्हणायला लागले. आता महापालिका निवडणुकांच्या समोर पुन्हा नामांतराचा वाद ऐरणीवर आला आहे. वाद सुरुही राहिल मात्र यातून पायाभूत सुविधांचे जे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुटणार आहे का? याचं उत्तर कुणाजवळही नाही.
हेही वाचा - औरंगाबाद महानगरपालिका उपमहापौर निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी होणार?
CAA Protest | आधी नमाज मग कायद्याविरोधात आवाज | औरंगाबाद | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement