एक्स्प्लोर
औरंगाबाद महानगरपालिका उपमहापौर निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी होणार ?
उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने महानगरपालिकेची निवडणूक चार महिन्यांवर आली असताना उपमहापौरपदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्तेत असणारी शिवसेना उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीशी समीकरण करून निवडणूक लढवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना भाजपाच्या उपमहापौरांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता उपमहापौर पदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र येणार की एमआयएम आणि भाजप एखाद्या पक्षाला उभा करून शिवसेनेला शह देणार याची चर्चा रंगली आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाचा भाजपानं राजीनामा दिला आणि महानगरपालिकेमध्ये असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली. गेली सत्तावीस वर्ष सभागृहात शिवसेना-भाजपा एकत्र येऊन एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समोर असायची. आता त्याच महानगर पालिकेच्या सभागृहात शिवसेना भाजपचे नगरसेवक एकमेकांच्या समोर आलेले पाहायला मिळाले आहे. उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने महानगरपालिकेची निवडणूक चार महिन्यांवर आली असताना उपमहापौरपदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्तेत असणारी शिवसेना उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीशी समीकरण करून निवडणूक लढवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
औरंगाबाद पालिकेत पक्षीय बलाबल
औरंगाबाद महानगर पालिकेत एकूण 115 नगरसेवक आहेत. त्यापैकी शिवसेनेचे 29 , भाजपा 23, एमआयएम 24, काँग्रेस 11 , बहुजन समाज पार्टी 5, राष्ट्रवादी 4, रिपाई (डी) 2, अपक्ष 17 आहेत.
शिवसेनेचा दावा आहे की, त्याच्याकडे 11 अपक्ष नगरसेवक आहेत . सेना 29, काँग्रेस11 ,राष्ट्रवादी 4 असं पक्षीय बलाबल एकत्र आले तर महाराष्ट्र विकास आघाडी काठावर पास होऊ शकते .पण इकडे एमआयएम आणि भाजप एखाद्या अपक्षला उभं करून सेनेला शह देण्याच्या तयारीत आहेत.
महाविकास आघाडीला एकत्र येऊन उपमहापौर पदाची निवडणूक लढवायची असेल तर निश्चितच या पदावर काँग्रेस दावा करेल. भाजपाला असं वाटतं की, काँग्रेसमधील एखाद्या मुस्लिम उमेदवारांन उपमहापौरपदी दावा केला तर निश्चितच सेना कोंडीत येऊ शकेल आणि भविष्यातलं हिंदुत्वाच्या राजकारणाला खीळ बसेल. शिवाय शिवसेनाही काँग्रेसचा एखादा बिगर मुस्लिम उमेदवार देण्यासाठी आग्रही असेल. याहीपेक्षा महत्त्वाचं राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला औरंगाबाद महानगरपालिकेत यशस्वी होतो का? आणि भविष्यातील निवडणुकीत औरंगाबाद महानगरपालिका शिवसेना महा विकास आघाडी त्या समीकरणातून लढवणार का? याचंही उत्तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement