एक्स्प्लोर

Aurangabad Renamed : खडकी ते औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर, काय आहे नावाचा इतिहास?

Aurangabad Renamed : औरंगाबाद नावाचा नेमका इतिहास आहे तरी काय?

Aurangabad Renamed : औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यास आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परिपत्रक काढत याबाबतची माहिती दिली. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावे, अशी शिवसेनेची मागणी होती. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. आता शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं केले. याला केंद्राची मंजुरी मिळाली आहे.  बिवी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर ए अंबरी अशा एक ना अनेक ऐतिहासिक वास्तू असलेल्या औरंगाबाद या नावाचा नेमका इतिहास आहे तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद नावाचा नेमका इतिहास आहे तरी काय?

मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता त्यात औरंगाबादचं नाव 'राजतडक' असल्याचं आढळून आले आहे.  हे नाव कुणी ठेवले त्या नावाचा वास्तिविकतेशी काय संबंध यावर अजूनही प्रकाश पडलेला नाही. या शहराचं नावाजलेलं नाव हे खडकी आहे. हा परिसर बेसॉल्ट खडकावर वसलेला आहे. त्यात शहरात अगदी प्राचीन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे, अशी इतिहासात नोंद आहे.

त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता ख-या अर्थानं 'नहरे ए अंबरी' सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं. मात्र  त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही.  कालांतरानं 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव 'फतेहनगर' असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगरवरुन 'खुजिस्ता बुनियाद' असे ठेवले.  कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं.  ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.

काळाच्या ओघात औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी झाली. अजिंठा आणि वेरुळ सारख्या वास्तूंमुळे अगदी जगाच्या कानाकोप-यात औरंगाबादचं नाव दुमदुमलं. मात्र हेच नाव आता बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या. नाव बदलण्यामागं राजकारण हे एकमेव कारण असल्याच अभ्यासक  सांगतात.  हा  प्राचीन काळापासून हा ट्रेन्ड सुरु असल्याचे दाखले ते देतात.

आतापर्यंत शहाराच्या नावामागं शहराशी निगडीत सखोल अभ्यास असायचा. संभाजीनगर नावामागंही काही इतिहास आहे का हे सुद्धा शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यात सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह आहेत . शिवसेना असो वा भाजप मात्र याचा उपयोग  राजकारणासाठी होतो. कदाचित संभाजी महारांच्या याच इतिहासाच्या प्रेमापोटी आता या शहरचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. किंवा निवडणुका समोर आल्या म्हणून पुन्हा जुना मुद्दा नवीन करण्याचा प्रयत्न आहे.  मात्र वरवर तरी औरंगजेबाचं नाव या शहराला नको अशीच भूमिका शिवसेना मांडत आहे.

 संभाजी महाराजांचा वध औरंगजेबानं केला आहे. त्यामुळं कदाचित त्या औरंगजेबाचं नाव या शहराला नको असे शिवसेनेला वाटत असावे. काळ बदलला मात्र अजूनही सत्ता बदलली की आपल्या पद्धतीनं नाव बदल्याचा प्रयत्न त्या त्या काळातील राजा करतो हेच यामागील सत्य म्हणावे लागेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारने निर्णय, आता कमीत कमी पाचशे
100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारने निर्णय, आता कमीत कमी पाचशे
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
मोठी बातमी! उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराजांना ठोकल्या बेड्या; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, नेमकं काय कारण?
मोठी बातमी! उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराजांना ठोकल्या बेड्या; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, नेमकं काय कारण?
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaManoj Jarange PC Sambhajinagar : Devendra Fadnavis मराठ्याच्या मागण्या पूर्ण करतील अशी आशा : जरांगेABP Majha Headlines : 12 PM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Full PC : अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 14 वर करण्याचा विचार, अजित पवार यांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारने निर्णय, आता कमीत कमी पाचशे
100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारने निर्णय, आता कमीत कमी पाचशे
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
मोठी बातमी! उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराजांना ठोकल्या बेड्या; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, नेमकं काय कारण?
मोठी बातमी! उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराजांना ठोकल्या बेड्या; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, नेमकं काय कारण?
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
दोन प्रदेशाध्यक्ष एकाचवेळी कोराडी देवीच्या दर्शनाला; नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
दोन प्रदेशाध्यक्ष एकाचवेळी कोराडी देवीच्या दर्शनाला; नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Pune Crime: बाप की सैतान! पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार अन्..., असे झाले काळे कारनामे उघड
बाप की सैतान! पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार अन्..., असे झाले काळे कारनामे उघड
Sangli News : सांगली शहरातील मोकाट कुत्र्यांचा थेट मनपा आयुक्तांनाच फटका; कार अपघातात डोक्याला दुखापत
सांगली शहरातील मोकाट कुत्र्यांचा थेट मनपा आयुक्तांनाच फटका; कार अपघातात डोक्याला दुखापत
Manoj Jarange : ...तर फडणवीसांच्या कारकि‍र्दीतील मोठी चूक असेल, मनोज जरांगेंचा गंभीर इशारा, नेमकं काय म्हणाले?
...तर फडणवीसांच्या कारकि‍र्दीतील मोठी चूक असेल, मनोज जरांगेंचा गंभीर इशारा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget