एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद झालं धाराशिव; केंद्राची परवानगी

Chatrapati Sambhajinagar : औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे.

Chatrapati Sambhajinagar : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असेही फडणवीस यांनी म्हटले.  

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावाने मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो. हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील नामांतराची मागणी केली जात होती.  मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांची हत्या केली. त्यामुळे त्याच्या नावाचे शहर नको. अशी मागणी घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी करण्यात येत होती.  आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे.

असा आहे नामांतराचा प्रवास (Aurangabad To Chhatrapati Sambhaji Nagar)

  • 1988 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत संभाजीनगर नामकरण करण्याचा नारा दिला. 
  • 1995 जूनमध्ये औरंगाबादचे 'संभाजीनगर'  नामांतर करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला.
  • 1995 राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली. 
  • 1996  मध्ये मुश्ताक अहेमद यांनी औरंगाबादच्या नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
  • 1999 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. त्यामुळे नामकरणाचा प्रस्ताव पुढे सरकला नाही.
  • 2002 मध्ये मुश्ताक अहेमद यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली निघाली.
  • 2020 मार्चमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणबाबतची न्यायालय याचिका, एनओसीबाबत शासनाने प्रशासनाकडून माहिती मागविली.
  • 2021  मध्ये 'सुपर संभाजीनगर' असा नारा देत शहरात डिस्पले लागले. त्यातच पालकमंत्र्यांच्या सरकारी दौऱ्यात संभाजीनगर छापून आल्याने वादाला तोंड फुटले.
  • 2022 जूनमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामकरणाचा मुद्दा मार्गी लावण्याबाबत जाहीर सभेत वक्तव्य केले. 
  • 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला.
  • 14 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला.
  • 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.
  • 24 फेब्रुवारी 2023 : केंद्र सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव... याला मंजुरी दिली.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Embed widget