एक्स्प्लोर

मराठवाड्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे बनवाबनवी?

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला उशीर झालेला असल्यानं प्रशासनानं सोलापूरला असलेलं आयआयटीएमचं विमान मागवलं आणि प्रयोगाला सुरुवात झाल्याचा बनाव केला. दोन दिवस हे विमान औरंगाबादला थांबलं सुद्धा आणि आता ते सोलापूरला परत सुद्धा गेलं आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात सुरु असलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे बनवाबनवीचा प्रकार आहे की काय? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कृत्रिम पावसाबाबत 8 ऑगस्टला विभागीय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची सगळी तयारी पुर्ण झाली असल्याचं सांगितलं. कृत्रिम पावसासाठी लागणारं विमान आलं असून आता प्रयोगाला सुरुवात करत आहोत अशी माहिती यावेळी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कृत्रिम पावसासाठी लागणारं विमान अजूनही सौदी अरेबियातच असल्याचं आता पुढं आल आहे. कृत्रिम पावसासाठी जी समिती तयार करण्यात आली होती त्यांनी 8 ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेत सगळी तयारी पुर्ण झाली असून लवकरच सुरुवात करण्यार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हे सगळं खोटं असल्याचं आता पुढं आलं आहे. ती प्रयोगाची सुरुवात नव्हती तर फक्त चाचणी असल्याचंही समोर आलं आहे. कृत्रिम पावसासाठी डॉपलर रडार बसलं हे सत्य आहे मात्र यासाठी महत्वाचं असणारं सी 90 विमान अद्यापही औरंगाबादमध्ये नाही तर भारतातच आलेलं नाही. अमेरिकेहून निघाल्यावर हे विमान आता सौदी अरेबियात अडकलं आहे. हे विमान यायला किमान अजून आठवडा लागणार आहे. त्यामुळंच उशीर झालेला असल्यानं प्रशासनानं सोलापूरला असलेलं आयआयटीएमचं विमान मागवलं आणि प्रयोगाला सुरुवात झाल्याचा बनाव केला. दोन दिवस हे विमान औरंगाबादला थांबलं सुद्धा आणि आता ते सोलापूरला परत सुद्धा गेलं आहे. राज्य शासनाने ज्या केसीएमसी कंपनीला कंत्राट दिले आहे, त्या कंपनीचे विमान अमेरिकेहून सौदी अरेबियात दाखल झाले आहे. त्याठिकाणी सध्या विमानातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे, तपासणीचे काम सुरू आहे. 17 तारखेला ते विमान भारतात दाखल होईल. अहमदाबादमध्ये कस्टम विभागाच्या प्रक्रिया पूर्ण करून 18 तारखेला विमान औरंगाबाद विमानतळावर प्रयोगासाठी सज्ज असेल, असं आता सांगण्यात येत आहे. त्यामुळं राज्य शासनाकडून कृत्रिम पावसाची तारीख पाळण्यासाठी ही दिखावेगिरी केली जात असल्याची चर्चा आता आहे. या गोंधळात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ठेवलेले 31 कोटी पाण्यात जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यात हे सगळं झाकण्यासाठी प्रशासनाची ही बनवाबनवी सुरु आहे का? असा प्रश्न पडत आहे. मराठवाड्यात पाऊस का पडत नाही? | स्पेशल रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
संभाजीनगरच्या राजभोग हॉटेलमध्ये अस्वच्छतेचा कळस! FDAच्या धडक कारवाईनंतर परवाना निलंबित, सुरक्षेच्या 88 पैकी फक्त 18 गुण!
संभाजीनगरच्या राजभोग हॉटेलमध्ये अस्वच्छतेचा कळस! FDAच्या धडक कारवाईनंतर परवाना निलंबित, सुरक्षेच्या 88 पैकी फक्त 18 गुण!
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी महायुतीत बंडखोरी, आघाडीतही उमेदवारीचा पेच; बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश येणार?
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी महायुतीत बंडखोरी, आघाडीतही उमेदवारीचा पेच; बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश येणार?
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Sangola Drought : सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
Embed widget