एक्स्प्लोर
Advertisement
महाविकास आघाडीत काँग्रेसची फरफट होऊ नये, मंत्रिमंडळात नव्या-जुन्या नेत्यांचं 'कॉम्बिनेशन' हवं : अशोक चव्हाण
काँग्रेसच्या वाट्याला 12 कॅबिनेट मंत्रिपदं आली आहेत. त्यात कुणाची वर्णी लागणार याचा सस्पेन्स अजून कायम आहे. अशावेळी अशोक चव्हाणांनी या सरकारमध्ये पक्षाची फरफट होऊ नये यासाठी प्रशासनाचा अनुभव असलेल्यांची वर्णी लागणं गरजेचं असल्याचं सुचवलं आहे.
मुंबई : महाविकास आघाडीत काँग्रेसची फरफट होऊ नये यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ, अनुभवी आणि नव्या दमाच्या नेत्यांचं कॉम्बिनेशन मंत्रिमंडळात असलं पाहिजे अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली आहे. ते आज एबीपी माझाच्या ऐसपैस गप्पा या कार्यक्रमात बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरही खातेवाटपाचा निर्णय का होत नाही? आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या दोन्ही चव्हाणांचं नेमकं काय होणार या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. काँग्रेसच्या वाट्याला 12 कॅबिनेट मंत्रिपदं आली आहेत. त्यात कुणाची वर्णी लागणार याचा सस्पेन्स अजून कायम आहे. अशावेळी अशोक चव्हाणांनी या सरकारमध्ये पक्षाची फरफट होऊ नये यासाठी प्रशासनाचा अनुभव असलेल्यांची वर्णी लागणं गरजेचं असल्याचं सुचवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement