Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
Ashadhi Wari Pandharpur : उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी (Chandrabhaga River) दुथडी भरून वाहत असून वाळवंट आणि मंदिरे पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे.

Ashadhi Wari Pandharpur : उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी (Chandrabhaga River) दुथडी भरून वाहत असून वाळवंट आणि मंदिरे पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. आषाढी सोहळ्यासाठी संतांच्या पालख्या हजारो भाविकांसमवेत पंढरपूरची वाट चालत असून अनेक भावी विठ्ठल दर्शनासाठी पुढे पंढरपुरात येत आहेत. सध्या चंद्रभागेत सोडलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असून पाण्याचा अंदाज न आल्याने भाविकांच्या बुडण्याच्या घटना समोर येत आहेत.
अशातच, काल(22 जून) एका दिवसात सहा भाविकांना चंद्रभागेत बुडताना प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचविले आहे. स्नानासाठी उतरलेल्या भाविकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा घटना घडत असून प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी आता पुढे येत आहे.
चंद्रभागा नदीत बुडणाऱ्या 6 भाविकांना वाचवण्यात यश
सध्या आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागेची पूर परिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणा मधून जवळपास 26,600 विसर्गने पाणी सोडण्यात येत आहे. यात्रा कालावधीत पाऊस झाल्यास धरणात पाणी साठवता यावे यासाठी हे नियोजन प्रशासनाने केले असून अजून पाच ते सहा दिवस असेच पाणी सोडण्यात येणार आहे. बुडणाऱ्या भाविकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 40 स्थानिक कोळी बांधवांची नेमणूक केलेली असून याच कोळी बांधवांनी काल सहा भाविकांना वाचवले आहे. मात्र प्रशासनाने चंद्रभागेच्या तीरावर सुरक्षारक्षक नेमल्यास बुडण्याच्या दुर्घटना घडणार नाहीत, असे देखील बोललं जात.
आषाढीत भाविकांना महापुराचा त्रास होऊ नये, यासाठी उजनी धरणातून सोडण्यात येत असणारे प्राणी चंद्रभागेत पोचू लागले असून चंद्रभागा व वाळवंटातील काही मंदिरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आषाढीला भाविकांना चंद्रभागेत स्नानापुरते पाणी ठेवण्यासाठी 28 ते 29 जून पर्यंत पाणी सोडण्यात येणार असून यानंतर जरी पाऊस झाला तरी उजनी धरणात वरून येणारे पाणी साठवायला जागा राहील. याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
चंद्रभागा नदीवरील पूल अन् मंदिरं पाण्याखाली
दरम्यान आज पुन्हा उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 26600 क्युसेक इतका करण्यात आला असून उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थोडा कमी झाला आहे. दरम्यान सध्या चंद्रभागा वाळवंटातही पाणी वाढण्यास सुरुवात झाली असून पुंडलिकासाठी इतर मंदिरात जाताना भाविकांना पाण्यातून जावे लागत आहे. आषाढी दरम्यान भाविकांना पुरीच्या पाण्यात स्नान करताना प्रशासनाला सूचना जिल्ह्याचे यात्रा कालावधीत जरी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी पूजनी धरणात हे पाणी साठवायला जागा करून घेण्यासाठी आत्ता धरणातून पाणी सोडणे सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काल भागवत एकादशी असून पंढरपूर महासफाई अभियाना अंतर्गत जवळपास 6 स्वयंसेवक सोबत पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि आमदारांनी सफाई केली.
हे ही वाचा
























