Yashomati Thakur: "त्यांच्यापुढे जो कागद येतो तो त्या वाचतात, त्यांना डोकं वापरण्याची मुभा नाही"; यशोमती ठाकूर यांचे निर्मला सीतारमण यांच्यावर टीकास्त्र
Yashomati Thakur: निर्मला सीतारमण त्यांच्यासमोर जो कागद येतो तो त्या वाचतात. त्याच्या पलीकडे त्यांना डोकं वापरण्याची मुभा नाही. अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी निर्मला सीतारमण याच्यावर टीका केली आहे.
![Yashomati Thakur: union budget 2024 congress mla Yashomati Thakur Criticism on finance mnister nirmala sitharaman budget modi government maharashtra marathi news Yashomati Thakur:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/01/0e149388986c2b1299a1412341a58a8a1706778152632892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या अतिशय पावरफुल्ल आहे, असे मला वाटलं होतं. आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना त्या छान घोषणा त्या ठिकाणी करतील अशी अपेक्षा मला होती. मात्र आता या अर्थसंकल्पानंतर असे वाटायला लागले आहे की, त्यांच्याही हातात काहीही राहिलेले नाही. त्यांच्यासमोर जो कागद येतो तो त्या वाचतात. त्याच्या पलीकडे त्यांनाही डोकं वापरण्याची मुभा नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur ) यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण याच्यावर टीका करत आजच्या अंतरिम अर्थसंकल्पावर भाष्य केले.
अतिशय फेलिअर असं बजेट
आजचा अर्थसंकल्प मोघम स्वरूपाचा झालेला आहे. इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून पाहिजे त्या घोषणा करत आहे. मात्र यात प्रत्यक्षात काहीच नाही. केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या अर्थसंकल्पात केले आहे. शेतकऱ्यांना निव्वळ चुना यात लावलेले आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी कुठेलेही नियोजन यात झालेले नाही. त्याचप्रमाणे बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेले नाहीये. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव आहे तेवढेच आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. कपाशीचे भाव आज एवढे खाली पडलेली आहे, एवढा कमी भाव याच्या आधी कधीच नव्हता. 2009 मध्ये 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र आता अवघा चार हजारच्या खाली भावा देत आहे. हे बजेट अतिशय फेलिअर असं बजेट आहे. भविष्यासाठी इथं कुठलेही नियोजन झालेले नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना दिली आहे.
एकीकडे प्रत्येकाला म्हणत आहेत की, तुम्ही अयोध्येला जा. दर्शन करून घ्या. मात्र आज इथे बजेटमध्ये शून्य आहे. अंगणवाडी ताई साठी या बजेटमध्ये काही नाही, विदर्भासाठी तर काहीच नाही. आज राज्यात आशाताई,आंगणवाडी सेविकांचा प्रश्न ज्वलंत आहे. त्यांच्यासाठी देखील फार काही या बजेट मध्ये नाही. एकंदरीत सर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या दृष्टीने या बजेटमध्ये कुठलीही समाधानकारक बाब नसल्याचे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.
निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा
- डीबीटी (DBT) च्या माध्यमातून देशातील 38 कोटी लोकांना थेट फायदा झाला.
- स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण
- पीएम मुद्रा योजनेंतर्गत 43 कोटी कर्ज दिले, पीएम मुद्रा योजनेंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले
- तरुणांच्या सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. 3 हजार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
- तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे.
- शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे.
- 10 वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- ग्रामीण भागातील 70 टक्के घरे महिलांना देण्यात आली. PM AWAS अंतर्गत 70 टक्के घरे महिलांना दिली.
- सर्व प्रकारचे पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. येत्या 5 वर्षांत गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधली जातील.
- येत्या 5 वर्षांत गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधली जातील, ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 कोटी घरे बांधली जातील, मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे.
- रूफटॉप सोलर प्लॅन अंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिट/महिना मोफत वीज
- अंगणवाडी केंद्राचा दर्जा वाढणार, 'आशा' कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्मान योजनेचा लाभ.
- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण वाढवले जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढवला जाईल.
- शेतीसाठी आधुनिक साठवण, पुरवठा साखळीवर भर, सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देईल, मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केले जाईल, सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे, सरकार 5 एकात्मिक एक्वा पार्क उघडणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)