एक्स्प्लोर

Amravati Rain : बळीराजा संकटात! अमरावती जिल्ह्यात काही गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचं अतोनात नुकसान

Amravati News : सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही ढगफुटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Amravati Sheti Nuksan : अमरावती जिल्ह्यात (Amravati Rain) गुरुवारी दुपारी काही गावात ढगफुटी सदृश्य पाऊस (Amravati Cloudburst) झाला. जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शिराळा, पुसदा, नांदुरा शेत शिवारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीत पेरलेल्या सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही ढगफुटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. आता सरकारकडे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी यावेळी केली जात आहे.

जुना प्रवासी निवारा कोसळून एकाचा मृत्यू

वाशिम-अमरावती महामार्गावर मंगरूळ तालुक्यातील धोत्रा गावातील जुना प्रवासी निवारा कोसळून एका व्यक्तीचा दबून  मृत्यू झाला. जोरदार पावसामुळे हा जुना जीर्ण अवस्थेत असलेला प्रवासी निवारा पावसाने कोसळला. या घटनेमध्ये देमाजी ठोंबरे या व्यक्तीचा दबून मृत्यू झाल्याची माहीती कळतंय पोलीस प्रशासन आणि गावकरी घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास पोलीस करत आहे.

पाहा व्हिडीओ : अमरावतीत शेतजमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान

वीज पडून दोघांचा मृत्यू 

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील दुर्दैवी घटना समोर आली आहे. निंबाच्या झाडाचा आश्रय घ्यायला गेलेल्या काका-पुतण्याचा घात झाला. चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील एका शेतात शेतकरी आणि शेतमजुर शेतीचे काम करत असतांना विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु होता. यावेळी शेतकरी सुनिल मोती भास्कर (वय 32), निलेश बजरंग भास्कर (वय 20) या दोघा काका-पुतण्याच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे.

आठ जण जखमी

शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतातील मजूर शेतातच असलेल्या लिंबाच्या झाडाचा आश्रय घेण्याकरीता गेले असता, यावेळी अचानक वीज पडल्याने सुनिल मोती भास्कर यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, निलेश बजरंग भास्कर याला उपचारासाठी टेम्बुरसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असता, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या शेतातच काम करणारे ललीता राजाराम जाम्बेकर (45), आरती सोमेश जाम्बेकर (20), पार्वती राजाराम भारकर (45), जानकी किशोर कास्टेकर (24), सविता चान्डेकर (28), होमपती मेटकर (55), बजरंग भास्कर (55), मिना बजरंग भास्कर (45) हे आठ जण जखमी झाले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Yashomati Thakur : अजितदादा तुम्हीसुद्धा… यशोमती ठाकूर यांचा सभागृहात हल्लाबोल; विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळत नसल्याने आक्रमक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget