एक्स्प्लोर

Bacchu Kadu : बच्चू कडू करणार अयोध्या दौरा, प्रभू श्रीराम चरणी मांडणार शेतकऱ्यांच्या व्यथा

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू हे 29 ऑक्टोबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे 29 ऑक्टोबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याविषयीची माहिती बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान 15 ऑक्टोबरला मुंबईत बच्चू कडू यांनी मुंबईत 'मेरा देश मेरा खून' या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेचा दुसरा टप्पा हा अयोध्येमध्ये होणार असल्याचं देखील यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा प्रभू श्रीराम चरणी बच्चू कडू मांडणार आहे. त्यासाठी त्यांच्या अयोध्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं चित्र आहे. तर अयोध्येला जाऊन शेतकऱ्यांसाठी प्रार्थना बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते अयोध्येला जाऊन करणार आहेत. 

बच्चू कडूंनी काय म्हटलं?

यावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, तकऱ्यांचं मरण होऊ नये म्हणून आम्ही प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहोत. तिथे ऊस, कापूस, तूर,  सोयाबीन आणि धान आम्ही प्रसाद चढवणार. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रथम स्तरावर या सरकारने घ्यावे म्हणून हा अयोध्या दौरा आहे. आम्ही आर्थिक आरक्षणाची लढाई लवकरच सुरु करु. त्यासाठी आम्ही संपूर्ण भारत फिरणार. शहिदांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही मेरा देश मेरा खून’ राबवत आहोत. या देशाच्या  स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिम, दलित या सगळ्यानी बलिदान दिलंय. 

हजारोंच्या संख्येने आयोध्येला जाणार - बच्चू कडू

आम्ही हजारोंच्या संख्येने अयोध्येला जाणार आहोत. या सरकारला बुद्धी दे ही प्रार्थना आम्ही प्रभू श्रीरामाकडे करु. शेतकऱ्यांचा विचार करणारं आणि त्यांच्या हिताचं सरकार यावं असं मागण आम्ही तिकडे मागू. अयोध्येमधील शहिदांचं स्मारक व्हावं. यासाठी देखील आम्ही जात आहोत, असं बच्चू कडू म्हणाले. 

'आमचं आंदोलन सरकारच्या बाजूने की विरोधात हे त्यांनी शोधावं'

आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सातत्याने सरकारवर रोष व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळत. यावेळी देखील त्यांनी याच मुद्द्यावर सरकारवर संताप व्यक्त केलाय. आम्ही जे आंदोलन सुरु केलंय ते सरकारच्या बाजूने आहे की त्यांच्या विरोधात हे सरकारने शोधावं. आम्ही मागणी करत आहोत. सरकारमध्ये आहे म्हणून मागणी करू नये असा काही कायदा नाही. सरकारला जर वाटत असेल हे आंदोलन त्यांच्या विरोधात आहे तर त्याची कोणतीही तमा आम्हाला नाही, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर घणाघात केला. 

बच्चू कडूंच्या या दौऱ्यामध्ये हजारो शेतकरी देखील सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी राष्ट्रवादी किसान दलने आमंत्रित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संत्राचा मुद्दा हा केंद्र सरकारचा आहे. बांग्लादेश संत्र्यावर आयात शुक्ल लावत असेल तर त्यांच्या मालावरही आपण लावावा, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण, मंत्री-आमदारांना गावबंदी, सीमेवरील जवानांसारखे कोपऱ्याने नेत्यांना ढकलणार; मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget