Maratha Reservation : 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण, मंत्री-आमदारांना गावबंदी, सीमेवरील जवानांसारखे कोपऱ्याने नेत्यांना ढकलणार; मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
Manoj Jarange Press Conference highlights : मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासाठी 25 ऑक्टोबरुपासूनचा आंदोलन कार्यक्रम जाहीर केला आहे.
अंतरवाली, जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला मराठा आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी 24 ऑक्टोबरची मुदत दिली होती. सरकारला दिलेली मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.
जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे: (Manoj Jarange Press Conference)
> 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू या उपोषण आंदोलनात कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नसल्याची जरांगे यांची घोषणा
> आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन करताना जरांगे यांनी शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला.
> राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही.
> प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व गावांच्यावतीने एकाच ठिकाणी ताकदीने साखळी उपोषण सुरू केले जाणार आहेत. पुढे 28 ऑक्टोबरपासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार
> प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी या वेळी केले.
> तूर्तास आंदोलनाची ही दिशा असून आंदोलन सुरू झाल्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा सांगितली जाईल असेही त्यांनी म्हटले.
> हे आंदोलन आणि साखळी उपोषण आणि त्याशिवाय 25 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पुढील आंदोलन सरकार झेपणार नसल्याचे इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
> कोणीही उग्र आंदोलन करायचे नाहीत. त्याला आपले समर्थन नाही. कोणीही आत्महत्या करायची नाही. हेच शांततेच आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
> आता वाटाघाटीचा प्रश्नच नाही.
> सर्व पक्षचे आमदार, खासदार, मंत्री,कायद्याच्या पदावर बसलेल्या लोकांना गावबंदी
> जनतेच्या मुळावर पाय देणे याला विकास म्हणत नाही, आमच्या मुंडक्यावर पाय देऊन कोणाला मोठं करायचे आहे
> मला कळत नाहीत म्हणून माझ्या सोबत एवढे मराठे.. त्यांच्या सोबत कोण आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना टोला
> आतून माहिती दिली जातेय,सरकार अंगावर माणसे घालत आहेत; जरांगे यांचा गौप्यस्फोट
> भारत-चीनच्या सीमेवरील सैनिकांसारखे कोपऱ्याने समाज नेत्यांना ढकलणार
> कायद्याच्या पदावर बसलेल्या एकाही माणसाने गावात येऊ नये.... पदावर बसलेल्या लोकांनी सरकार कडे जाऊन आरक्षण घेऊन यावे.