एक्स्प्लोर

Amit Shah : अमित शाह छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला किल्ले रायगडावर येणार, तटकरेंच्या घरी जेवणाचा बेत, पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?

Amit Shah in Maharashtra : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  हे आज(12 एप्रिल) रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrpati Shivaji Maharaj) आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे.

Amit Shah Maharashtra Daura : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  हे आज(12 एप्रिल) रायगड (Raigad) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrpati Shivaji Maharaj) आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्यामुळे अमित शाह हे किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन करणार आहे. रायगडला जाण्यासाठी ते कालच पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील रिट्झ कार्लटन हॅाटेल येथे शाह हे मुक्कामाला आहेत. प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मुरलीधर मोहोळ स्वागतासाठी उपस्थित होते. रात्री 11 वाजता एकनाथ शिंदे देखील पुण्यात दाखल झाले. रात्री यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे आणि अमित शाह देखील भेटल्याची माहिती आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन कोकणात वातावरण तापलं असून तिढा पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे या पालकमंत्री पदासंदर्भातदेखील चर्चा झाली असल्याचे बोलले जात असताना अमित शाहांचा आजच्या रायगड दौऱ्यानिमित्य या तिढा सुटणार का आणि कोणाची पारड्यात रायगडचं पालकमंत्रिपद मिळतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

पालकमंत्रिपदाच्या वादाच्या दरम्यान डिनर डिप्लोमसी 

अशातच, गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्य महायुतीत काहीशी चलबिचल होताना दिसत आहे. त्याला कारण ठरलं आहे ते रायगडचं पालकमंत्रिपद. त्या अनुषंगाने गाठीभेटी होतानाही दिसत आहे. दरम्यान आज (शनिवारी) अमित शाह रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र  रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाच्या दरम्यानच होत असलेल्या या गाठी-भेटीमुळे, जेवण आणि चर्चा यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून, डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा सुटू शकतो, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

किल्ल्यावर येण्यास शिवभक्तांना कुठलीही बंदी नाही- रायगड पोलीस 

दरम्यान, रायगड किल्ल्यावर गृहमंत्री अमित शाह येण्याच्या पार्श्वभूमीवर देखील किल्यावर जाणारा रोप-वे सुरुच राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांना येण्यास कुठलीही बंदी घालण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिस अधिक्षक सोमनाथ घर्गे यांनी दिली आहे. त्यामुळे या दौर्‍याचा शिवभक्तांच्या रायगड दर्शनावर कुठलाही परिणाम होणार नाही. 

हे ही वाचा 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget