सुतारवाडीत अमित शहा तटकरेंकडे भोजनाला जाणार; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदेंसह गोगावलेंना नाराज होण्याचं कारण नाही
गृहमंत्री अमित शहा जर तटकरेंच्या घरी जात असतील तर गोगावले, एकनाथ शिंदे आम्हाला नाराज होण्याचं कारण नाही. असं बावनकुळे म्हणालेत.

Chandrashekhar Bavankule: नाशिक आणि पालघरच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही राज्यात सुरुच आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाला देण्यात आलेली स्थगिती अजून कायम असून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटणार असल्याची चर्चा आहे. आता पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळणार की अदिती तटकरे यांना मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे दरम्यान, या दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसले. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. गृहमंत्री अमित शहा जर तटकरेंच्या घरी जात असतील तर गोगावले, एकनाथ शिंदे आम्हाला नाराज होण्याचं कारण नाही. असं बावनकुळे म्हणालेत.
शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला विरोधकांनी घेरल्याचे चित्र होते. यावरही त्यांनी 'आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल,जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा, आमच्या संकल्प पत्रा मधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही,जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला तो विकास आम्ही करू' असं आश्वासन दिलंय.
काय म्हणाले बावनकुळे?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 12 एप्रिलला ते रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील. सुतारवाडीला मंत्री सुनिल तटकरेंच्या घरी भोजनाला जातील. यावर बावनकुळे म्हणाले,'आमच्या अमित भाई शहा यांनी महायुतीतील एका पक्षाच्या अध्यक्षाला वेळ दिला आहे.हे आमचे संस्कार आहे. अमित शहा जर तटकरेंच्या घरी जात असेल तर गोगावले एकनाथ शिंदे,आम्ही नाराज होण्याच कारण नाही.
सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्वच पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिल आहे,एकनाथ शिंदेंना निमंत्रण दिला आहे ,गोगावलेंना निमंत्रण दिलाय मलाही निमंत्रण दिलं आहे. या भेटीचा राजकीय अर्थ कोणी काढू नये. असेही बावनकुळे म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीवर बावनकुळे म्हणाले...
आम्ही जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीला समोर गेलो तेव्हा आम्ही संकल्प केला होता,आणि त्यामध्ये आम्ही पाच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलं होतं.
त्या संकल्प मध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी पाच वर्षात आम्ही पूर्ण करू असं सांगितलं होतं.. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होती.आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल,जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा, आमच्या संकल्प पत्रा मधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही,जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला तो विकास आम्ही करू असे बावनकुळे म्हणाले. आमचा संकल्पना नामा 100%आहे ,आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. शंकर संकल्पनांमध्ये जो आम्ही शब्द दिला आहे ते आमचं महायुतीचे सरकार पूर्ण करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.























