एक्स्प्लोर

Rohit Pawar: 'ते' एक प्रतीक म्हणून औरंगजेबाच्या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल; रोहित पवारांची स्पष्ट भूमिका, म्हणाले...

औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीचा जोर वाढला आहे .

Ahilyanagar: औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण चांगलच तापलंय .मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या संघटनांकडून औरंगजेबाची कबर उखडून टाका असे मागणी वारंवार केली जात आहे .दरम्यान,विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर पाडा अन्यथा बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू असा इशाराच दिल्याने आक्रमक वातावरण आहे .या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या औरंगजेब कबर(Aurangzeb Tomb) परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ही वाढवण्यात आलाय .यावरून आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीये .27 वर्षे औरंगजेबाला इथे राहून राज्यकर्ता आले नाही याचा प्रतीक म्हणजे ही औरंगजेबाची कबर आहे .हिकबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील .त्यामुळे एक प्रतीक म्हणून या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल .असे रोहित पवार म्हणाले आहेत . (Rohit Pawar)

काय म्हणाले रोहित पवार ?

औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण चांगलंच तापले आहे . अनेकांनी ही कबर उखडून टाकण्याची मागणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी औरंगजेबाची कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील .27 वर्षे औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आले नाही त्याचे प्रतीक म्हणजे औरंगजेबाची कबर आहे .त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावण्याचे योग्य ठरेल असे रोहित पवार म्हणाले .

छावा चित्रपटात क्रूर राज्यकर्ता म्हणून दाखवण्यात आल्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणत गवगवा केला . त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही झाली . दरम्यान औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीचा जोर वाढला आहे .

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले

दरम्यान आज विश्व हिंदू परिषदेने ही अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत राज्यभर 17 तारखेला जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना याबाबत निवेदन जाणार असल्याची माहिती दिली .औरंगजेबाची कबर काढून टाकले नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन कार सेवा करतील असा इशारा बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला . औरंगजेबाची कबर पाडा ही मागणी वारंवार केली जाऊ लागल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेब कबर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे .एस आर पी एफ ची एक तुकडी तसेच दोन अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत . कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चेक करून सोडले जात आहे .

हेही  वाचा:

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget