(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MP Viral Video: 'दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत' मध्य प्रदेशच्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
MP Viral Video: खंडवा जिल्ह्यात सध्या 55 देशी आणि 19 विदेशी दारूची दुकाने सुरू आहेत.
MP Viral Video: खांडवा जिल्हा प्रशासनानं गुरुवारी (18 नोव्हेंबर 2021) कोरोनाबाबत आढावा बैठक बोलावली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खंडवा जिल्ह्यात मेगा लसीकरण मोहिम राबवली जातं आहे. या मोहिमेतंर्गत प्रत्येक नागरिकाला लसीकरण करणे बंधनकारक आहे, अशी या बैठकीत चर्चा झाली. याचदरम्यान, जिल्हा प्रशासनानं दारू खरेदी करणाऱ्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच दारू विकली जाईल, असं सांगण्यात आलं. मात्र, दारू खरेदी करण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक नसल्याचं खंडवा जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यानं म्हटलंय. दारू खरेदी करणाऱ्यांनी तोंडी दिलेली माहिती पुरेशी असेल. तसेच दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत, असंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय. या अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून लसीकरणाचा वेग आणखी वाढवा, या उद्देशानं जिल्हा प्रशासनानं दारू दुकानांवर लसीकरण प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक केलं. मात्र, खंडवा जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी आरपी किरार यांच्या वक्तव्यानं सर्वांच वेधून घेतलं. दारू पिणारं खोटं बोलत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
ट्वीट-
महत्वाचं म्हणजे, मध्य प्रदेशातील खांडवा हा एकमेव जिल्हा नाही, जिथे अशाप्रकारचं नियम लागू करण्यात आले. यापूर्वी, तमिळनाडूमधील अनेक जिल्ह्यांमध्ये असेच नियम लागू करण्यात आले. उधगमंडलमच्या जिल्हाधिकाऱ्यानं सप्टेंबर महिन्यात लसीकरण झालेल्या नागरिकांनाच दारू विकली जाईल, असा आदेश काढला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशात लसीचा डोस नमूद करण्यात आले नव्हते. तर, निलगिरी जिल्ह्यातील TASMAC सारख्या काही दुकानांनी दारू खरेदी करताना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक केलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Coronavirus Cases Today : सलग 43व्या दिवशी देशात 20 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद, 267 मृत्यू
- Farm Laws : शेतकरी मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी; काँग्रेस आज 'शेतकरी विजय दिवस' साजरा करणार
- Andhra Pradesh Rains : आंध्रात पुराचा कहर! 8 जणांचा मृत्यू, तर 12 बेपत्ता, हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक बचावकार्य