(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : सलग 43व्या दिवशी देशात 20 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद, 267 मृत्यू
Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 10 हजार 302 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 10 हजार 302 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 3,44,99,925 वर पोहोचला आहे. तर या काळात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात 1,24,868 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. जाणून घेऊयात, देशातील कोरोनाची ताजी आकडेवारी...
मृतांची संख्या वाढून 4,65,349 वर पोहोचली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 267 रुग्णांनी गेल्या 24 तासांत जीव गमावला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळं जीव गमावलेल्या रुग्णांचा एकूण आकडा वाढून 4,65,349 पोहोचला आहे. तर काल दिवसभरात 1,752 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सलग 43व्या दिवशी 20 हजारांहून कमी रुग्ण
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसची दैनंदिन आकडेवारी सलग 43व्या दिवशी 20 हजाराहून कमी आहेत. सलग 146व्या दिवशी 50 हजारांहून कमी आहेत. दैनंदिन संसर्गाचा दर 0.96 टक्के नोंदवण्यात आला, जो गेल्या 47 दिवसांतील दोन टक्क्यांनी कमी आहे. साप्ताहिक संसर्गाचा दर 0.93 टक्के नोंदवण्याता आला आणि हा गेल्या 57 दिवसांत दोन टक्क्यांनी कमी आहे.
राज्यात शुक्रवारी 906 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 15 जणांचा मृत्यू
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (शुक्रवारी) 906 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 918 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 72 हजार 681 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के आहे.
राज्यात काल (शुक्रवारी) 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 99 हजार 309 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 44 , 89, 471 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 238 रुग्णांची भर तर दोन जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 238 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 272 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2808 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,39,075 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2274 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :