मोठी बातमी : ठाकरेंच्या आमदाराने तहसीलदारांना नगरपालिकेत कोंडलं, नेमकं काय आहे प्रकरण?
Nitin Deshmukh: बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेत कोंडलं.
अकोला : बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेत कोंडलं. आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे संतापलेल्या आमदार नितीन देशमुखांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं. अनुपस्थित अधिकारी आल्याशिवाय कुणालाच आतून सोडणार नाही असा पवित्रा आमदार नितीन देशमुख यांनी घेतला.
नेमकं प्रकरण काय?
शेतकऱ्यांच्या पीकविमाबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, कुणाला विमा उतरवताना अडचणी येत आहेत तर काही तांत्रिक कारणं आहेत. या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. नगरपालिकेत ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी या बैठकीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे नितीन देशमुख प्रचंड संतापले. त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं.
जोपर्यंत विमा कंपनीचे पदाधिकारी याठिकाणी येत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढच नाहीत तोवर तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,सर्व दरवाजे लावून घ्या असंही आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आणि तक्रारी आहेत. अनेक शेतकऱ्यांना विम्याचे पैसै मिळात नाहीत. तर अनेकांना पीक विमा भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आलेलं होतं. मात्र त्यांनी या बैठकीला उपस्थित न राहिल्याने देशमुखांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवल्याचं समोर आलं आहे.
बैठकीला बोलवून देखील उपस्थित न राहिलेले अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकारी जोपर्यंत हजर होत नाहीत, तोपर्यंत तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणार असल्याचं सांगत आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी शेतकऱ्यांना दार लावालाच्या सूचना केल्या. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरती देखील त्यांनी संताप व्यक्त केला आहे. याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.