Kirit Somaiya : अकोला जिल्हा बांगलादेशींना नागरिकत्व देण्याचं केंद्र, सात तालुक्यांत 15,845 बोगस प्रमाणपत्र; किरीट सोमय्यांचा आरोप
Kirit Somaiya On Illegal Bangladeshis : अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांना बोगस नागरिकत्वाचं प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा आरोप करत किरीट सोमय्यांनी त्याची आकडेवारी दिली.
Kirit Somaiya On Illegal Bangladeshis : अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांग्लादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात 15 हजार 845 बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी गंभीर आरोप केला. किरीट सोमय्या यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घोतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला.
किरीट सोमय्या यांनी अमरावती, भिवंडी आणि मालेगावात बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अमरावती, नाशिक, नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयांतून मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
याचसंदर्भात किरीट सोमय्या यांनी नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीने विधानसभेत व्होट जिहादसाठी हे घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला.
अकोल्यातील बांगलादेशी नागरिकत्व प्रमाणपत्रांबाबत सोमय्यांनी दिलेली आकडेवारी
- अकोला - 4849
- अकोट - 1899
- बाळापूर - 1468
- मुर्तिजापूर - 1070
- तेल्हारा - 1262
- पातूर - 3978
- बार्शिटाकळी - 1319
एकूण - 15,845
ही बातमी वाचा: