(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Radheshyam Mopalwar : श्रीनिवास पाटील ते सुमीत वानखेडे, अधिकारी थेट राजकारणात, आता राधेश्याम मोपलवार यांचा नंबर?
देशभर सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष आता आपले उमेदवार निश्चित करू लागलेत. त्यातच आता राधेशाम मोपलवार हे देखील राजकारणात एन्ट्री करतील अशी चर्चा जोरदार रंगली आहे.
मुंबई : माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांनी मुख्यमंत्री वॉर रुमच्या (War Room) महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राजकारणात देखील एन्ट्री करतील अशी चर्चा रंगू लागली आहे.जर ते राजकारणात आले तर राजकारणात येणारे राधेश्याम मोपलवार हे एकमेव अधिकारी नसतील तर याआधीही अनेक अधिकाऱ्यांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आणि ते यशस्वीही झाले आहेत.
देशभर सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष आता आपले उमेदवार निश्चित करू लागलेत. त्यातच आता राधेश्याम मोपलवार हे देखील राजकारणात एन्ट्री करतील अशी चर्चा जोरदार रंगली आहे. मुख्यमंत्री वॉर रुमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही चर्चा अधिकच रंगू लागलीय. मोपलवार हिंगोली किंवा नांदेड -लोकसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. राधेश्याम मोपलवार यांच्या बाबत ज्या चर्चा रंगल्या तसे झाले तर आजवर ज्या अधिकाऱ्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांच्या यादीत मोपलवार असणार आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांची राजकारणात एन्ट्री?
- श्रीनिवास पाटील - शरद पवारांचे खास मित्र माजी सनदी अधिकारी जिल्हाधिकारी आणि अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले असून, त्यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जिंकली.
- प्रताप दिघावकर - माजी पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी ऑगस्ट 2023 मध्ये भाजपात प्रवेश केला असून, ते धुळे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जातेय..
- प्रदीप शर्मा - इन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये शिवसेना पक्षाकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
- अभिमन्यू पवार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले अभिमन्यू पवार यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीतून राजकारणात एन्ट्री झाली. ते औसा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
- श्रीकांत भारतीय - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओएसडी म्हणून काम पाहिले होते. आता ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत
- सुमित वानखेडे - देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव राहिलेल्या सुमित वानखेडे यांच्यावर सध्या वर्धा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातून विधान सभेसाठी त्यांनी तयारी देखील सुरू केलीय.
अलीकडच्या काळात अधिकारी वर्गाला राजकीय क्षेत्राची भुरळ पडत असल्याचं दिसून आलं आहे. जशी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या राजकारणाबाबत जवळीक वाटू लागली आहे तशीच नेत्यांनाही अधिकाऱ्यांच्या राजकीय प्रवेशाने मदतच होत असल्याचं चित्र आहे. अनेक अधिकारी राजकारणात आल्यानंतर त्यांची महत्त्वाच्या पदांवर लागलेली वर्णी आणि त्यातून नेत्यांची घट्ट झालेली पकड असे अनेक कंगोरे यामागे दडलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री वॉर रुमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिलेले मोपलवार आता राजकारणात कधी एन्ट्री करणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.
हे ही वाचा :