एक्स्प्लोर

ABP Majha Impact : निलंबनानंतर पोलीस उपनिरीक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल, अकोला तुरुंगातील मारहाणीत संशयिताच्या मृत्यूप्रकरणी कारवाई

Akola : पोलीस कोठडीत संशयीत आरोपीच्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तब्बल दोन महिने अकोला पोलिसांनी प्रकरण दडपून ठेवले होते. 

अकोला : पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरेसह एका पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन झालं होतं. या प्रकरणात अकोला पोलिसांनी (Akola Police) वरिष्ठांनी लक्ष घातल्यानंतर संशयित पीएसआय राजेश जवरेसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध अकोट पोलिसांत खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातीलच अकोट पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल झाले. 302, 34 नूसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल झालेत.

वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरेसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे

या प्रकरणात आरोप असलेला पोलीस उपनिरिक्षक राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी 'सोळंके' या दोघांचं आधी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान वैद्यकीय अहवालानूसार मृतक गोवर्धन याच्या अंगावर जखमा असून मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या गैरवर्तनाच्या संशयावरुन दोघांनाही निलंबित करण्यात येत आहे असे आदेशात नमुद आहे. 

अकोटचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एक अहवाल तयार केला आहे. याच अहवालानुसार जवरेसह तिघांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता जवरेसह दोषींच्या बडतर्फीची मागणी नातेवाईक करीत आहेत. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे' आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला ताब्यात घेतलं. त्यानंतर 16 जानेवारीला त्याला त्याच्या सुकळी या गावात आणत घरझड़ती घेतली. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. 

पुढे  पोलिसांनी गोवर्धनसह त्याचे सध्या तक्रारदार असलेले त्याचे काका सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजतादरम्यान दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती. एवढ्यावरच न थांबता पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि त्यांच्या साथीदारांनी मृतक गोवर्धनच्या पार्श्वभागात दांडा टाकून क्रूरतेचा कळस गाठला. 

सरकारी दवाखान्यात न नेता खाजगी दवाखान्यात उपचार 

या गंभीर मारहाणीत गोवर्धनच्या छातीची हाडं तुटली. गंभीर अवस्थेत असलेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्या दवाखान्यानं उपचारास नकार देत त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवायचा सल्ला दिला. अकोट ग्रामीण रुग्णालयाने त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र जवरेच्या सांगण्यावरून त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात भरती न करता पोलिस कारवाईच्या भितीने अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात त्याला भरती करण्यात आलं. 

मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला उपचार दरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि वैद्यकीय कागदपत्रांनुसार त्याच्या छातीची हाडं तुटली होती असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे. 

प्रकरण दाबण्यासाठी अकोल्यातच केलेत अंत्यसंस्कार 

गोवर्धनचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. त्याचे कुटुबीय अकोल्यात आल्यानंतर त्यांनी मृतदेह गावी नेण्याचा आग्रह केला मात्र, त्यांना धमकावत त्यांच्याकडून आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचं जबरदस्तीने लिहून घेण्यात आलं. त्यानंतर अकोल्यात गरीब आणि अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असलेल्या संस्थेशी संपर्क साधून अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देण्यात आला. गावात अंत्यसंस्कार झाले असते तर प्रकाराचा बोभाटा झाला असता म्हणून अकोल्यात घाईघाईत गोवर्धनवर अंत्यसंस्कार करवून घेतल्याचं बोललं जात आहे. 

मृतकाच्या कुटूंबियावर पोलिसांचा दबाव

या संपूर्ण प्रकरणानंतर गोवर्धनचं कुटुंब प्रचंड दहशतीत होतं. मात्र प्रकरणाच्या तब्बल दोन महिन्यांनंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार करण्याचा निर्णय घेतली. दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी काही बाहेरील व्यक्तीमार्फत आपल्याला धमकावत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. गोवर्धनचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार अकोल्यातच करण्यासाठी आकाश चावरे या व्यक्तीमार्फत त्याच्या कुटुंबीयांना धमकवण्यात आलं. 

हा आकाश चावरे कोण? आणि त्याचा बोलविता धनी कोण?, हेही पोलीस तपासात समोर येणं गरजेचं. विशेष म्हणजे या प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नाही. गोवर्धनला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण गरजेचं होतं. पण झालं नाही, असेही तक्रारीत म्हटलं आहे. 

शवविच्छेदनाच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासे  

गोवर्धन याच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवालात मृत्यूचं कारण आतापर्यंत समजू शकल नाही. मात्र प्राथमिक अहवालात गोवर्धन याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या. अशी माहिती आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी दिली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी अद्याप याप्रकरणी गंभीर भूमिका घेतली नाही. अखेर कुटुंबीयांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली. आता या प्रकरणात चौकशी समिती गठित झाली आणि पुढील चौकशी पोलीस करताहेत. 

दोन वर्षांपूर्वी अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शेगावच्या सराफावर असेच अत्याचार केले होतेय. त्या प्रकरणात 'एबीपी माझा'च्या पाठपुराव्यानं मोठी कारवाई होत तीनजण बडतर्फ तर दोनजण निलंबित झाले होते. निष्णात गुन्हेगारासारख्या वागणाऱ्या राजेश जवरे आणि इतर साथीदारांवर सरकार अशीच बडतर्फीची कारवाई करणार का?, हाच खरा प्रश्न आहे. 

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget