एक्स्प्लोर

मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला

डॉ मधुरा फडणीस - खराडकर, चाईल्ड नेफ्रोलॉजिस्ट, अंकुरा हॉस्पिटल फॉर विमेन अँड चिल्ड्रेन, पुणे

पुणे :  लहान मुलांमधील किडनीच्या आजाराची लक्षणे व उपाय कोणते याबाबत या लेखातून माहिती मिळेल. कारण, एका संशोधनातून लहान मुलांमध्ये किडनी (Kidney) विकाराचं प्रमाण वाढीस लागल्याचं पाहायला मिळत आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस - भटिंडा आणि विजयपूर आणि द जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ इंडियाच्या संशोधकांनी मुलांचे राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण (CNNS) केलेल्या संशोधनानुसार 2016 ते 2018 दरम्यान 5-19 वर्षे वयोगटातील 24,690 मुले म्हणजेच 4.9 टक्के व प्रति 10 लाख लोकसंख्येतील 49,000 प्रकरणांमध्ये मुलांना किडनी विकार आढळून आला आहे. त्यामुळे, तज्ज्ञ डॉक्टरांनी (Doctor) यावर लक्षणे व उपाय सांगत मोलाचा सल्ला दिला आहे. 

मूत्रपिंडाचा आजार केवळ प्रौढांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही आढळून येतो. मूत्रपिंडाच्या आजारामुळे (मूत्रपिंडाचा बिघाड) किडनीचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते आणि त्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. एखाद्याचे मूत्रपिंड निकामी होऊ शकतो.  अचानक तीव्र मूत्रपिंडाचा आजार सुरू होतो. मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या आजारास कारणीभूत जोखीम घटकांमध्ये जन्मजात विकृती, अनुवांशिक विकार, मूत्रमार्गाचे संक्रमण, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, नेफ्रोटिक सिंड्रोम, हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम, ल्युपस सारखे विकार, ठराविक औषधांचे सेवन, निर्जलीकरण आणि आघाताने किंवा मूत्रपिंडाला झालेली दुखापत यांचा समावेश आहे.

लक्षणे कोणती?

किडनीचा विकार असलेल्या मुलांना रक्तस्त्राव, ताप, पुरळ, शौचावाटे रक्त, उलट्या, लघवी न होणे किंवा भरपूर लघवी होणे, त्वचेचा रंग फिका पडणे, ऊतींना सूज येणे, भूक न लागणे आणि वाढ खुंटणे यासारखी लक्षणे दिसतात. ही लक्षणे मुलाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय आणू शकतात.

उपचार: 

उपचारांमध्ये ठराविक औषधं, आहारातील बदल आणि रक्तातील क्षार (इलेक्ट्रोलाइट्स) जसे की पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियमचे निरीक्षण केले जाऊ शकते. मूत्रपिंडाला तीव्र दुखापत असलेल्या तसेच कायमस्वरूपी मूत्रपिंड निकामी  झालेल्यांसाठी डायलिसिसचा सल्ला दिला जातो. तसेच अंतिम टप्प्यातील मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांसाठी किडनी प्रत्यारोपण हा शेवटचा उपचार पर्याय उपलब्ध असेल. मुलांमध्ये किडनीचे आजार होऊ नयेत, याची पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

· पालकांनी योग्य हायड्रेशन सुनिश्चित केले पाहिजे: मुलांना दिवसभर हायड्रेटेड राखणे गरजेचे आहे.  ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यात मदत होईल आणि त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्य सुधारते.

· पुरक आहाराची निवड करा: मुलांनी फळे, भाज्या आणि तृणधान्यांचा समावेश असलेला समतोल आहार घ्यावा. पालकांनी मुलांच्या पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे. प्रक्रिया केलेले अन्न, अधिक प्रमाणात मीठाचे सेवन आणि शर्करायुक्त पेयांचे सेवन मर्यादित करणे ही मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी चांगली सवय आहे.

· वजन नियंत्रित राखा: लठ्ठपणामुळे मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो, म्हणून नियमित शारीरिक हालचाली आणि वजन नियंत्रित खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन द्या.

· मूत्रमार्गाच्या संसर्गावर उपचार करा (UTIs): उपचार न केल्यास मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. तुमच्या मुलाला मूत्रमार्गाच्या संसर्गाची शक्यता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

· रक्तदाबाचे निरीक्षण करा: विविध अभ्यासानुसार, उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाचा आजार होण्याची शक्यता वाढते असे दिसून आले आहे. त्यामुळे रक्तदाब सामान्य पातळीत मर्यादेत ठेवा आणि मूत्रपिंडाच्या समस्या टाळा.

· आरोग्याच्या समस्यांचे त्वरित व्यवस्थापन करा: पालकांनो, जर तुमच्या मुलाला मधुमेह किंवा इतर जुनाट आजार असतील तर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांनी त्याचे व्यवस्थापन करा.

· तुमचा कौटुंबिक इतिहास जाणून घ्या: मूत्रपिंडाच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास, दररोज मूत्रपिंडाच्या कार्याचे योग्य निरीक्षण करा आणि बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

·  नियमित तपासण्या चुकवू नका: किडनीला कोणतेही नुकसान होणार नाही खात्री करत वैद्यकिय तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्या.

हेही वाचा

मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
Dhule Crime News : खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हानNitin Gadkari on Nagpur :  नितीन गडकरींनी नागपुरकरांची माफी का मागितली ?Ajit Pawar Full PC : तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न ; आम्ही सोडवू, अजित पवार भुजबळावर काय म्हणाले?ABP Majha Headlines :  1 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
Dhule Crime News : खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी
आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले
आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले
Sanjay Raut: अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे आयडॉल, म्हणून... संजय राऊतांची टीका, म्हणाले..
दोन भाऊ एकत्र आले त्याचा आनंद, पण.... ; राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या भेटवर संजय राऊतांची टीका
Embed widget