संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
अशा प्रकारे कोणता आरोपी निर्ढावलेला असेल, त्याला असं वाटत असेल की कायद्यापेक्षा मी मोठा आहे. तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि सरकारचीसुद्धा तीच भूमिका आहे असं शिरसाट म्हणाले.
Sanjay Shirsat बीड मधील मस्साजोग प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी आक्रमकपणे मुद्दा लावून धरलाय. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून यंदाचा हिवाळी अधिवेशन हे चांगलंच गाजलं. यादी बसनात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीच्या आदेश दिल्या असून कोणालाही सोडणार नसल्याचे म्हटलं. दरम्यान बीडमध्ये या प्रकरणावरून राजकीय घटनांना वेग आलाय. मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांच्या पोलीस तपासाबाबत आढावा घेतलाय. नवनीत कोवत यांच्याशी चर्चा करत या प्रकरणाच्या तपासासाठी 28 डिसेंबरची डेडलाईन असून तोपर्यंत आरोपीला अटक केली जाईल असं संजय शिरसाठ म्हणालेत.
ते म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज sp भेट घेऊन त्यांचा तपास कोणत्या मार्गाने चालू आहे त्याची सुद्धा चौकशी केली. एसपीनेसुद्धा मला सांगितले की यात जे काही गुन्हेगार आहेत. त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत. दोन ते तीन दिवसांमध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 डिसेंबरच्या अगोदर हे आरोपींना अटक केली जाईल असं एकंदरीत एसपीच्या बोलण्यावर मला जाणवलय. त्याचे फोटोग्राफ जरी आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. अशा प्रकारे कोणता आरोपी निर्ढावलेला असेल, त्याला असं वाटत असेल की कायद्यापेक्षा मी मोठा आहे. तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि सरकारचीसुद्धा तीच भूमिका आहे. असं शिरसाट म्हणाले.
वाल्मिक कराडांना अटक करण्याची मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरुन यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून कुणालाही सोडणार नसल्याचे म्हटले. मात्र, याप्रकरणी सातत्याने वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून मराठा क्रांती मोर्चाने देखील तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशा मागणीचे निवेदनही बारामतीमधील मराठी क्रांती मोर्चाच्या सदस्याने दिले आहे. आता, काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही धनंजय मुंडेंच्या राजानाम्याची मागणी केली आहे. अजित पवारांवर ज्यावेळेला आरोप झाले , तेव्हा अजित पवारांना देखील मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून चौकशी झाली तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, असे पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा:
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी