Amol Mitkari VIDEO : गाडी फोडणाऱ्या आरोपीचा मृत्यू; अमोल मिटकरी म्हणाले, आता तरी राज ठाकरे यांनी...
Akola Rada Update : गोरगरीब मुलांच्या खांद्याचा वापर करून कोणता पक्ष राजकारण करत असेल तर त्याचा निषेध, या स्तरावर कुणीही जाऊ नये असं आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
अकोला: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न आणि त्यांच्या कारच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला एक आरोपी जय मालोकार (Jay Malokar) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेवर अमोल मिटकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. कुणाच्या चिथावणीनंतर जर सर्वसामान्य मुलाचा जीव जाणार असेल तर हे कसलं राजकारण असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारला. आपण मालोकर कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत, राज ठाकरेंनीही मुंबई सोडून मालोकर कुटुंबीयांच्या भेटीला यावं अशी विनंतीही त्यांनी केली.
MNS Jay Malokar Death : राज ठाकरेंनी मालोकर कुटुंबीयांची भेट घ्यावी
अमोल मिटकरी म्हणाले की, 26 वर्षांचा एक युवक , कुणाच्या तरी चिथावणीनंतर या राड्यात गेला आणि नंतर त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तोही त्याच्या पक्षाचं काम करत होता. पण अभ्यास करणारा तरूण जाणं याचं वाईट वाटतंय. मला काही झालं असतं, माझं कुटुंब उघड्यावर पडलं असतं तर यांनी काय केलं असतं? राजकारणाच्या या स्तरावर कुणीही जाऊ नये. ही घटना घडली याचं तीव्र दुःख आहे. मी सुद्धा त्याच्या परिवाराची भेट घेईन. जरी त्याने भावनेच्या भरात काही केलं असलं तरी कष्ठ करणाऱ्या घरातील एक मुलगा गेला आहे. माझी मनसे पक्षप्रमुखांना विनंती आहे की त्यांनी मुंबई सोडून इथं यावं.
जीव जाणार असेल तर हे कुठलं राजकारण?
अमोल मिटकरी म्हणाले की,सर्वसामान्यांचा राजकारणात जर जीव जाणार असेल तर हे कुठलं राजकारण आहे? या घटनेला कुठलंही राजकारण आणणार नाही. मी जर माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशी चिथावणी दिली असती आणि त्यामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला असता तर त्याच्या आई-वडिलांना काय उत्तर दिलं असतं. माझा पक्ष तसा आदेश मला देत नाही. मी राजकारणाच्या पलिकडे पाहतो. मालोकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सामील आहे. मात्र एखाद्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब मुलांच्या खांद्याचा वापर जर कोणता पक्ष करत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे.
ही बातमी वाचा: