एक्स्प्लोर

मोठी बातमी! अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू

Amol Mitkari : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडताना झालेल्या झटापटीनंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांना अस्वस्थ वाटत होतं. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

अकोला: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेले मनसेच्या कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार सहभागी होते. 

राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. त्यामध्ये जय मालोकार यांचाही सहभाग होता. या राड्यानंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण आता त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. 

मिटकरींची गाडी फोडणाऱ्या आरोपींमध्ये जय मालोकार

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील पूरपरिस्थितीवरून टीका केली होती. त्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली. 

प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता

या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी 12 कार्यकर्ते फरार झाले. जय मालोकारही त्यामध्ये होते. पण त्यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

अमोल मिटकरींच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला

मनसे कार्यकर्त्याच्या झालेल्या मृत्यूनंतर आता मनसेचे कार्यकर्ते एकत्र जमण्यास सुरूवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. अमोल मिटकरींच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.  या प्रकरणानंतर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. 

जय मालोकार यांच्या कुटुंबीयांना मिटकरी भेटणार

जय मालोकर याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. आपण लवकरच जय मालोकार याच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांनी आता या मृत मनसैनिकाच्या कुटुंबीयांना भेटायला यावं असं आवाहनही यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Embed widget