एक्स्प्लोर

Akola News: धक्कादायक! अकोल्यात पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये दुषित पाणी प्यायल्याने 70 मुलींना उलट्या, बातमी फुटू नये म्हणून...

Akola News: अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात धक्कादायक प्रकार. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 70 हून अधिक महिला दुषित पाणी प्यायल्याने आजारी पडल्या. ही माहिती दडवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

अकोला: अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 70 प्रशिक्षणार्थी मुलींना दुषित पाण्यामुळे विषबाधा, कॉलरा आणि कावीळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सर्वात आधी हे प्रकरण 'एबीपी माझा'ने समोर आणलं होतंय. आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर अकोल्यात आले. त्यांनी गडंकी भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्राला (Police Training Center) भेट देत पाहणी केलीय. दरम्यान, या प्रकरणाच्या 'एसआयटी' (SIT) चौकशीची मागणी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्य सरकारकडे केलीये. तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सरकारला दिले आहेत.

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 70 हून अधिक महिला पोलिसांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दुषित पाणी प्यायल्याने ट्रेनिंगवर असलेल्या या पोलीस महिला पोलिसांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यात वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे या सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना मळमळ आणि उलट्या (Vomiting) होत होत्या. काल या सर्व महिला पोलिसांना अकोल्यातल्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलीस प्रशिक्षण केंद्राने या गंभीर प्रकाराबाबत आधी चुप्पी साधलीय. काल 'माझा'ने यासंदर्भातील बातमी सर्वात आधी दाखवलीय. आमच्या बातमीनंतर आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर अकोल्यात आले.

निलम गोऱ्हे यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या राज्यात विविध जिल्ह्यातून पोलीसांत भरती झालेल्या 741 मुली प्रशिक्षण घेतायेत. काल उपचार सुरू असलेल्या खाजगी रुग्णालयात आमदार अमोल मिटकरी, भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकरांनी भेट दिलीय. दरम्यान, या प्रकरणाच्या 'एसआयटी' चौकशीची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारकडे केलीये. तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सरकारला दिले आहेत.

आणखी वाचा

गूड न्यूज! महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बंपर भरती, 17471 रिक्त जागांवर भरती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : देवेंद्र फडणवीसांनी कितीजणांना सोडलं, अडकवलं याच्या तपासासाठी SIT हवीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट : 02 Jan ABP MajhaRajan Salvi Full PC on Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार? राजन साळवींचं थेट उत्तर...Top 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 02 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Maharashtra government Cabinet meeting: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut : बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
Embed widget