Akola Accident News: रस्त्यात कार बिघडली; गाडी टो करून नेताना भरधाव वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर, अकोल्यात दिवाळीच्या रात्री घडली घटना
Akola Accident News: अमरावतीकडे जाणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने खाली उतरलेल्या चारही जणांना चिरडलं. यात दोन पुरूष आणि एका महिलेचा जागीच अंत झालाय. तर एकजण गंभीर जखमी झालाय.

अकोला: दिवाळीच्या रात्री अकोल्यात भीषण अपघाताची (Akola Accident News) दुःखद घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील काटेपूर्णा ते पैलपाडा गावादरम्यान एका अज्ञात वाहन आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात (Akola Accident News) झाला आहे. अपघातात 3 जण ठार तर 1 जखमी झाला आहे. बोरगावमंजू येथील धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट हे दांपत्य खेर्डी येथील आपला व्यवसाय आटोपून एका प्रवासी कारने बोरगावमंजूकडे घरी निघाले होते.(Akola Accident News)
मात्र, रस्त्यात कार बिघडल्याने एका मालवाहू वाहनाद्वारा गाडी टो करून नेण्याचे प्रयत्न सुरू असताना हे सर्व गाडीच्या खाली उतरलेले होते. याचवेळी अमरावतीकडे जाणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने खाली उतरलेल्या चारही जणांना (Akola Accident News) चिरडलं. यात दोन पुरूष आणि एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झालाय. (Akola Accident News)
मृतांमध्ये धिरज सिरसाठ, अश्विनी सिरसाट या पती-पत्नीसह आरिफ खान या चालकाचा समावेश आहे. हे तिघेही बोरगावमंजूचे रहिवासी होते. तर गाडीचा वाहक गंभीर जखमी असून त्याच्यावर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोला पोलिसांकडून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी झालेल्या या अपघाताने अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू गावावर शोककळा पसरली आहे.(Akola Accident News)

























