एक्स्प्लोर
अजित पवारांच्या दौऱ्याला बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर गटाची दांडी
![अजित पवारांच्या दौऱ्याला बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर गटाची दांडी Ajit Pawars Beed Visit Jaydatt Kshirsagar Absence अजित पवारांच्या दौऱ्याला बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर गटाची दांडी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/17212936/ajit-pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का असा प्रश्न पडलाय. कारण आज बीडमध्ये अजित पवारांच्या स्वागताला जयदत्त क्षीरसागर किंवा त्यांच्या गटातील कुणीही उपस्थित नव्हतं. मात्र त्यांचे पुतणे आणि संदीप क्षीरसागर त्यांच्या सोबत होते.
आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या गटानं अजित पवारांच्या दौऱ्याला दांडी मारल्यानं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर पत्रकारांशी बोलताना, कुटुंबात एकोपा राहावा हिच इच्छा आहे, अशी भावाना अजित पवारांनी व्यक्त केली.
दरम्यान, यावेळी आयोजित सभेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सुरेस धस यांना आमदारकी, मंत्रिपद देऊनही त्यांनी गद्दारी केली. निचपणा केला, अशा शब्दात अजित पवार यांनी धस यांच्यावर निशाणा साधला.
बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुरेस धस गटानं भाजपला मदत केली. त्यानंतर धस यांना राष्ट्रवादीनं निलंबित केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)