एक्स्प्लोर

Ajit Pawar : अंजली दमानियांनी कागदपत्र दिली, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, अजित पवारांनी रोखठोक सांगितलं!

बीड प्रकरणातील तथ्य आणि पुराव्यानिशी कुणाचं नाव आल्यास त्यावरही कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मात्र कुणाचा काही संबंध नसताना कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय.

मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) काही कागदपत्रे मला दिली असून ती मी बघितली आहेत. कॅबिनेट झाल्यानंतर मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटणार होतो. मात्र त्यांना नागपूरला जायचं असल्याने ही भेट तेव्हा होऊ शकली नाही. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर काही विषयांवर त्यांच्याशी मला चर्चा करायची होती. फोनवर वेळोवेळी आम्ही चर्चा केली आहे, मात्र प्रत्यक्षात आमोरासमोर बसून चर्चा करायची होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला अँटी चेंबरमध्ये बोलवलं आणि आम्ही त्या अनुषंगाने चर्चा केली. यात विविध विषयांच्या अनुषंगाने आम्ही चर्चा केली. यात मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलंय की, ज्याप्रमाणे अंजली दमानिया तुम्हाला भेटल्या तशाच त्या मला देखील भेटल्या. त्यांनी मलाही काही कागदपत्रे दिली आहेत. 

मात्र या प्रकारणी जी काही चौकशी सुरू आहे, ज्यामध्ये एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी अशी तीन प्रकारे चौकशी सुरू आहे. त्या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे हे तपासली पाहिजे आणि  त्यानंतर या बाबत ठरवलं पाहिजे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दिलीय. या बाबत  मुख्यमंत्री असतील किंवा मी स्वतः असेल आम्ही वेळोवेळी सांगितलं आहे की, बीड इथं ज्याप्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यात जो कोणी दोषी असेल त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीनेच प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, अजित पवारांनी रोखठोक सांगितलं!

या प्रकरणातील तथ्य आणि पुराव्यानिशी अजून कुणाचं नाव आल्यास त्यावरही कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मात्र कुणाचा काही संबंधच नसताना कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. किंबहुना कुणाचा संबंध असल्यास त्याला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. हिच भूमिका माझ्यासह राज्याच्या मुख्यमंत्र्यांची असल्याची प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंच्या  राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. 

कुणीही असलं तरी त्यावर कारवाई केलीच जाईल- अजित पवार 

दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. अशातच अजित पवार यांनी स्वतः आपल्या पदाचा  राजीनामाचा दिल्याचाही दाखला दिला जात आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माझ्या राजीनामा देण्यामागचं कारण वेगळं होतं. मला असाह्य वेदना होत होत्या, त्यामुळे तेव्हा मी माझा राजीनामा दिला होता. या प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा हेच सांगेल की, या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्या कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कुणी ही असलं तरी त्यावर कारवाई केली जाईल. असे स्पष्टीकरणही अजित पवार यांनी यावेळी दिले आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Embed widget