एक्स्प्लोर

VIDEO Ajit Pawar : बीड प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, पण एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको; काय म्हणाले अजित पवार? 

Santosh Deshmukh Murder Case : सुरेश धसांना काय वाटतं त्याच्याशी मला काही घेणंदेणं नाही, खालचे कार्यकर्ते असं बोलायला लागले तर त्याला काही अर्थ राहणार नाही असं अजित पवार म्हणाले. 

मुंबई : संतोष देशमुखांची अतिशय वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली, या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पण या प्रकरणात एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको, ज्याचा संबंध नाही त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही असंही ते म्हणाले. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आलं आहे. त्याचे आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यवहार असल्याचे पुरावे अजित पवारांना दिल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं होतं. या प्रकरणी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्याविरोधात जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं अजित पवारांनी याआधीही सांगितलं होतं. 

निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको

अजित पवार म्हणाले की, "बीड प्रकरणात ज्या पद्धतीने हत्या झाली ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. यातील आरोपींना शिक्षा होणार. पण एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कुणालाही मान्य होणार नाही. यामध्ये जे कुणी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करणार."

या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यातून काय गोष्टी समोर येतात त्यावर पुढे काय करायचं हे ठरवलं जाईल. पण बीडमध्ये घडलेल्या घटनेमध्ये जे कुणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. पण ज्याचा कुणाचा संबंध समोर येईल त्याला पाठीशी घालणार नाही असं अजित पवार म्हणाले. 

सुरेश धसांशी काही घेणंदेणं नाही

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न हा भाजपचा नाही तर त्यावर अजित पवारांनी निर्णय घ्यावा असं आमदार सुरेश धस म्हणाले होते. त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. सुरेश धसांना काय वाटतंय त्याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. मी या सरकारमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतो असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. महायुतीचा निर्णय घेताना आम्ही तिघे एकत्र बसून निर्णय घेतो. पण असं वेगवेगळ्या पक्षांतील खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ उरणार नाही. 

 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Embed widget