एक्स्प्लोर

संजय राऊत जिथे प्रचाराला जातात तिथे अपयश येतंच, लंकेंच्या जनसंवाद यात्रेला आल्यास नगरचा निकाल उद्याच लागणार; भाजपची टीका

Ahmednagar loksabha : संजय राऊत जर उद्या निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेला येणार असतील तर अहमदनगर दक्षिणचा निकाल उद्याच लागेल, असा टोला भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी लगावला आहे.

Nilesh Lanke : निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी (Ahmednagar Lok Sabha Consitituency) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके (Sujay Vikhe Patil vs Nilesh Lanke) असा सामना रंगणार हे निश्चित झाले आहे. उद्यापासून निलेश लंके लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.  

महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे उद्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावरून आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत आहेत. ते लोकसभा मतदारसंघात स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू करत आहेत. 1 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान ही यात्रा असणार आहे. या यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अंकुश काकडे (Ankush Kakde) यांची उपस्थिती असणार आहे. मात्र संजय राऊतांच्या उपस्थितीवरून भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले (Shivaji kardile) यांनी जोरदार टीका केली आहे. 

तर अहमदनगर दक्षिणचा निकाल उद्याच लागला

शिवाजी कर्डिले म्हणाले की, निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या त्यांच्या प्रचाराला यावे लागणार आहे. परंतु संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.  संजय राऊत ज्या ठिकाणी जातात त्याठिकाणच्या उमेदवाराला 100 टक्के अपयश येते. ते जर उद्या निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेला येणार असतील तर अहमदनगर दक्षिणचा निकाल उद्याच लागला असं समजावं, अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे. 

आमदारकीचा राजीनामा देताना निलेश लंके भावूक

दरम्यान, आमदारकीचा राजीनामा देताना निलेश लंके भावूक झाल्याचे दिसून आले. मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. मात्र आपल्याला  लोकसभेला सामोरे जायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे म्हणत निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Vijay Shivtare: माझा नेता पलटूराम निघाला! बारामतीमधून माघार घेणाऱ्या विजय शिवतारेंना कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, नाशिकमधून लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget