(Source: Poll of Polls)
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, नाशिकमधून लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार?
Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याचिका दाखल केली होती.
Maharashtra Sadan Scam : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची महाराष्ट्र सदन घोटाळा (Maharashtra Sadan Scam) प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून उद्या सुनावणी होणार आहे. यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दीड वर्ष ऐकले जात नव्हते. पाच न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करून त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले आहेत. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक १२ वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा :
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 31, 2024
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना डिसचार्ज करण्यात आल होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दिड वर्ष ऐकले जात नव्हते. ५ न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करुन त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ… pic.twitter.com/mmaa8ELJjI
याचिकेच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांची याआधी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी देखील दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका केली होती. आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. छगन भुजबळांना मिळालेली क्लीनचिट कायम राहणार की? न्यायालय पुन्हा शिका सुनावणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
काय आहेत आरोप?
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटामधून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना रोखरक्कम लाचेच्या स्वरुपात मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने भुजबळां विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.
आणखी वाचा