![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shani Shingnapur : शनिशिंगणापूरचे कर्मचारी 25 डिसेंबरपासून बेमुदत संपावर, सुट्ट्यांच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणार तारांबळ
Shani Shingnapur Protest : शनिशिंगणापूरचे कर्मचारी आपल्या 10 मागण्यांवर ठाम असून त्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
![Shani Shingnapur : शनिशिंगणापूरचे कर्मचारी 25 डिसेंबरपासून बेमुदत संपावर, सुट्ट्यांच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणार तारांबळ shani shingnapur temple worker on indefinite protest from 25 december ahmednar maharashtra marathi news Shani Shingnapur : शनिशिंगणापूरचे कर्मचारी 25 डिसेंबरपासून बेमुदत संपावर, सुट्ट्यांच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणार तारांबळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/a234efb0a0b897de800973a7ae1078ab170332705631193_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर: श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानचे 400 कर्मचारी 25 डिसेंबरपासून बेमुदत संपावर (Shani Shingnapur Worker Protest) जाणार आहेत. आपल्या विविध मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत, मात्र देवस्थान अद्यापही निर्णय घेत नसल्यानं कर्मचारी युनियनने आक्रमक पवित्रा घेत संपावर जाण्याचा निर्यण घेतला आहे. कर्मचारी संपावर गेल्यास नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भावकांची तारांबळ होण्याची शक्यता आहे.
कर्मचारी आपल्या विविध 10 मागण्यांवर ठाम आहेत. मात्र देवस्थान अद्यापही निर्णय घेत नसल्याने कर्मचारी युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या संदर्भात शनिशिंगणापूर देवस्थान आणि कर्मचाऱ्यांमधील बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी बैठक घेऊन संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिशिंगणापूर देवस्थानचे सर्व कर्मचारी येत्या दिनांक 25 डिसेंबर पासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. या संदर्भात देवस्थानच्या कामगार युनियनच्या वतीनं देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात 25 मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत.
काय आहेत मागण्या? (Shani Shingnapur Worker Protest)
- सर्व कामगारांच्या अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा आणि पदनिश्चिती करा.
- दि. 1. 10. 2003 च्या करारानुसार पाचव्या वेतन श्रेणी प्रमाणे 2003 ते 2023 पर्यंतचा फरक अदा करून मागील फरकासह सर्व कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा.
- कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत समाविष्ट करून घ्या.
- सर्व कामगारांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा मोफत करा.
- कोरोना महामारीत मरण पावलेल्या कामगारांच्याच्या वारसांना नुकसान भरपाई द्या.
- मयत कामगारांच्या घरातल्या एका व्यक्तीला देवस्थानच्या सेवेत समाविष्ट करून घ्या.
- प्रॉव्हिडंट फंड कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा.
- देवस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन घडल्यास किंवा तसं आढळून आल्यास सदर कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी सदर कर्मचाऱ्यांची चौकशी समितीमार्फत चौकशी करावी.
- त्या चौकशी समितीमध्ये कामगार युनियनचे दोन संचालक प्रतिनिधी घ्या.
- कामगारांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी 58 वरून 60 वर्षे करा.
- कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचा पगार बोनस किंवा सानुग्रह अनुदान म्हणून बोनस देण्यात यावा.
- देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातला राहिलेला अर्धा पगार अदा करण्यात यावा.
शनिशिंगणापूर देवस्थानच्या कामगार युनियननं 25 डिसेंबरपासून संप करण्याचा निर्णय घेतल्याने नाताळ आणि सलग सुट्ट्याच्या निमित्ताने शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांना गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)