एक्स्प्लोर

प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, सहा जणांना जलसमाधी; अकोलेतील शोध मोहीम थांबली

SDRF boat capsizes in Pravara river : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटल्याची घटना गुरुवारी घडली होती. आता ठाणे टीडीआरएफच्या पथकाने दोन मृतदेह बाहेर काढले आहेत.

अकोले : प्रवरा नदीत (Pravara River) बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटल्याची (SDRF Boat Capsizes)  घटना गुरुवारी घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. बोट उलटल्याने तीन एसडीआरएफ (SDRF) जवानांचा मृत्यू झाला होता. तर दोन जणांचा शोध सुरु होता. आता दोन जणांचा मृतदेह सापडले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोन तरुण बुडाले होते. सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला होता. मात्र अर्जुन जेडगुले याचा शोध बुधवारी उशिरापर्यंत आढळला नाही. त्यामुळे तरुणाचा शोध घेण्यासाठी गुरुवारी एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या पथकातील पाच जण आणि स्थानिक असे एकूण सहा जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह बुधवारी सापडले होते.  तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र अर्जुन जेडगुले आणि स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) यांचा शोध गुरुवारी दिवसभर सुरु होता. 

प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

आता अर्जुन जेडगुले आणि गणेश देशमुख (वाकचौरे) यांचे मृतदेह सापडले आहेत. ठाणे येथील टीडीआरएफच्या (Thane TDRF) पथकाने दोनही मृतदेह बाहेर काढले आहेत. पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर दोन्ही मृतदेह सापडले. एकाचा मृतदेह घटनास्थळापासून जवळच तर दुसरा मृतदेह एक किमी अंतरावर सापडला आहे. या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अकोले (Akole) तालुक्यातील शोध मोहीम संपली आहे. 

सहा जणांना जलसमाधी, दोघांवर उपचार सुरु 

या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे नदीत पोहण्यासाठी आले होते. दोघांचे मृतदेह सापडले आहे. धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा, आणि स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे), अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार, कॉन्स्टेबल अशोक हिंमतराव पवार यांना बाहेर काढण्यात यश आले होते. दोघांवर सध्या उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. 

पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्याने बोट उलटली, प्रत्यक्षदर्शींची माहिती

नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी सकाळी एसडीआरएफचे पथक गावात दाखल झाले. त्यांची शोध मोहीम साडेसहा वाजेच्या सुमारास सुरू झाली होती. एसडीआरएफ (SDRF) पथकाच्या दोन बोट पाण्यात उतरल्या. काही वेळाने एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्याने क्षणार्धात बोट उलटली. बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वरती येता आले नाही, असे  प्रत्यक्षदर्शी सुगाव गावचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.

आणखी वाचा 

SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Ahilyanagar : भोंदू राजेंद्र गडगे याचा 'दत्तधाम दरबार' सील, पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
भोंदू राजेंद्र गडगे याचा 'दत्तधाम दरबार' सील, पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
Ahilyanagar Crime News: 'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?
'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?
Ahilyanagar Crime News: संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
IPL 2026: सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Embed widget