एक्स्प्लोर

Ruckus in Gautami Patil Event : नगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण; पोलिसांचा हुल्लडबाजांवर लाठीचार्ज

Ruckus in Gautami Patil Event : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता इथे आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा झाला. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला.

Ruckus in Gautami Patil Show : सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समीकरण नवं राहिलेलं नाही. तिचा कोणताही कार्यक्रम वादाशिवाय पूर्ण होत नसल्याचे चित्र वारंवार समोर येतं. त्यातच आता गौतमी पाटीलच्या आणखी एका कार्यक्रमात तुफान राडा झाला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता (Rahata) इथे आयोजित कार्यक्रमात हा राडा झाला असून हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ झाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. तर मोठ्या बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रम स्थळावरुन बाहेर काढावे लागले.

राडा होण्याचं कारण काय?

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गुरुवारी (23 फेब्रुवारी) रात्री गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मात्र गौतमीचा डान्स सुरु होताच काही प्रेक्षकांनी तिच्यावर पैशांची उधळण सुरु केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली. गौतमीने डान्स थांबवल्याने प्रेक्षकांनी कल्ला करत तुफान राडा घातला. अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना 60 बाऊन्सरसह आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. 

बाऊन्सर आणि पोलिसांच्या सुरक्षेत गौतमी कार्यक्रम स्थळावरुन बाहेर

पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही गोंधळ सुरुच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. एवढं होऊनही काही प्रेक्षकांनी गौतमी पाटील गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला अखेर बाऊन्सर आणि पोलिसांच्या गराड्यात गौतमी पाटील कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडली.

VIEO : Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांकडून लाठीचार्ज

नृत्याच्या शैलीमुळे गौतमी पाटील वादात

गेल्या काही महिन्यांपासून लावणी क्वीन गौतमी पाटीलची जोरदार चर्चा आहे. तिच्या कार्यक्रमांची चर्चा झाली नाही, असं कधी घडलेलं नाही. सुरुवातीला फारशी चर्चेत नसलेल्या गौतमीवर एका नृत्यादरम्यान केलेल्या अश्लील हावभावाने टीकेची झोड उठली. नंतर तिला अधिकच प्रसिद्धी मिळाली. तिच्या प्रसिद्धीमुळे तिला नृत्याच्या सुपाऱ्या देखील जास्त येऊ लागल्या. गौतमी पाटील तिच्या नृत्याच्या शैलीमुळे वादात अडकली होती. अश्लील हावभावामुळे गौतमी पाटीलने लावणीला बदनाम केल्याचा आरोप ज्येष्ठ लावणी कलावंतांनी तिच्यावर केला होता. या वादानंतर तिने माफी मागून असे प्रकार पुन्हा घडणार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु एवढं सर्व घडत असताना तिची लोकप्रियता मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. 

हेही वाचा

Gautami Patil Apology : 'मी आता सुधारले तरी जुने व्हिडीओ लावून का बदनाम करता?', गौतमी पाटीलने पुन्हा मागितली माफी

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका
अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका
Tukaram Mundhe : कारवाईच्या भीतीनं 'शटर' डाऊन तर काही ठिकाणी विक्रीच बंद; तुकाराम मुंढेंचा धसका! दुकानातून सुटे खाद्यतेल अचानक गायब; आहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?
कारवाईच्या भीतीनं 'शटर' डाऊन तर काही ठिकाणी विक्रीच बंद; तुकाराम मुंढेंचा धसका! दुकानातून सुटे खाद्यतेल अचानक गायब; आहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?
सावत्र बापाकडून चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस पोहोचले
सावत्र बापाकडून चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस पोहोचले

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget