एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rohit Pawar : छगन भुजबळांना सभा घ्याव्या लागताहेत, कॅबिनेटमध्ये त्यांचं ऐकलं जात नाही हे स्पष्ट; रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar On Maratha Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे, केंद्राने त्यावर निर्णय घेतला पाहिजे असं आमदार रोहित पवार म्हणाले. 

अहमदनगर: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मंत्री असताना त्यांना सभा घ्याव्या लागत आहेत, याचाच अर्थ या सरकारमध्ये मंत्र्यांच ऐकलं जात नाही हे स्पष्ट होतं. जर मंत्र्यांचं चालत नसेल तर सामान्य लोकांचे या सरकारमध्ये काय चालणार असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 

छगन भुजबळ यांनी राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावेळी जो लाठीचार्ज झाला त्यानंतर मनोज जरांगे हे घरात जाऊन बसले होते. मात्र राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्यांना घरातून आणून पुन्हा उपोषण स्थळी बसवले आणि त्यांना सांगितलं की शरद पवार साहेब आपल्या भेटीला येणार आहेत.

छगन भुजबळांच्या या टीकेनंतर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भुजबळ मंत्री असून त्यांना सभा घ्याव्या लागत आहेत, याचा अर्थ त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही. भुजबळांच्या या टीकेला मी योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देईन. 

रोहित पवार म्हणाले की, मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. केंद्र सरकारकडे जाऊन 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण कसं घेता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 

राजेश टोपे-रोहित पवारांनी मनोज जरांगेंना आणून बसवलं, भुजबळांचा आरोप

जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार (मनोज जरांगे) घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार यांनी त्याला (जरांगे) पहाटे तीन वाजता परत आणून बसवले.  त्याला सांगितलं, शरद पवारसाहेब येणार आहेत. शरद पवारांना लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाले हे सांगितलं नाही, असं भुजबळ म्हणाले. 

यावेळी छगन भुजबळांनी जालन्यातील लाठीचार्जवरुन गंभीर आरोप केले. मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी 70 पोलिसांवर हल्ले झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण महाराष्ट्रासमोर चुकीचं चित्र गेलं.  होममिनिस्टरच माफी मागू लागला,गुन्हे मागे घेऊ म्हणू लागला, त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचलं, असं भुजबळ म्हणाले. तसंच ओबीसींचे बोर्ड फाडणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याचा आदेश भुजबळांनी दिला.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरीABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Embed widget